नेपाळमध्ये सोशल मीडिया वापरावर बंदी आणल्यानंतर मोठा हिंसाचार उसळला असून सरकारने ही बंदी मागे घेतली. मात्र, मंगळवार, ९ सप्टेंबर रोजी निदर्शकांनी निदर्शेने सुरूचं ठेवली. याला हिंसक वळण मिळाले असून आंदोलकांनी राजकीय नेत्यांच्या घरांना, संसदेला लक्ष्य केले. दरम्यान, काही मंत्र्यांसह नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळमधील हिंसाचाराचा फटका हवाई सेवेलाही बसला आहे.
नेपाळमधील महत्त्वाचे काठमांडू विमानतळ बंद करण्यात आले आहे. यामुळे काठमांडूला जाणाऱ्या अनेक भारतीय विमानांनाही फटका बसला आहे. काठमांडू विमानतळावर दक्षिणेकडील विमानांचे आगमन थांबविण्यात आले आहे कारण जवळपासच्या भागात निदर्शकांनी लावलेल्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे दृश्यमानता कमी झाले आहे. विमान वाहतूक प्राधिकरणाचे अधिकारी ज्ञानेंद्र भूल यानी यासंदर्भात माहिती दिली आहे.
त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या इंडिगोची दोन विमाने – 6E1153 (दिल्ली- काठमांडू) आणि 6E1157 (मुंबई- काठमांडू) लखनौ विमानतळावर वळवण्यात आली आहेत. तसेच मंगळवारी दिल्ली- काठमांडू- दिल्ली मार्गावर चालणाऱ्या एअर इंडियाची तीन उड्डाणे – AI2231/2232, AI2219/2220 आणि AI217/218 रद्द करण्यात आल्याची माहिती आहे. इंडिगोनेही काठमांडूला जाणारी आणि येणारी सर्व उड्डाणे रद्द केली आहेत.
हेही वाचा..
हिंसक निदर्शनांनंतर नेपाळचे पंतप्रधान ओली यांचा राजीनामा
पंतप्रधान मोदी यांचा पंजाब दौरा कौतुकास्पद
वैश्विक टपाल क्षेत्र बळकटीसाठी भारताचे काय आहे पाउल ?
राजस्थानमध्ये बेकायदेशीर धर्मांतराच्या कारवाईचा कट उधळत दोघांना ठोकल्या बेड्या
नेपाळ सरकारने फेसबुक, एक्स यासह २६ सोशल मीडिया साइट्सवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. यानंतर नेपाळमध्ये गोंधळ उडाला. हिंसाचार उसळून येताच सरकारने बंदी उठवली. तसेच मंत्र्यांनी निषेध करणाऱ्या विद्यार्थ्यांना निषेध थांबवण्याचे आवाहन केले होते. मात्र, मंगळवारीही निदर्शने सुरूचं आहेत. निदर्शकांनी वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या घरांना आणि कार्यालयांनाही लक्ष्य करणे सुरूच ठेवले. मंगळवारी त्यांनी नेपाळच्या संसदेला आग लावली आणि पंतप्रधान आणि राष्ट्रपती दोघांच्याही खाजगी निवासस्थानांची तोडफोड केली. निदर्शकांनी मंत्र्यांची घरे असलेल्या सिंह दरबारवरही हल्ला केला.







