28 C
Mumbai
Friday, September 18, 2026
घरदेश दुनियाबलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; २५ जवान ठार

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; २५ जवान ठार

व्हिडीओ शेअर करत बलूच बंडखोरांचा दावा

Google News Follow

Related

- Advertisement -National Stock Exchange

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात हिंसाचार पुन्हा एकदा उसळला असून, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) पाकिस्तानी लष्करावर दोन स्वतंत्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. या हल्ल्यांमध्ये २५ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाल्याचे बलूच आर्मीने म्हटले आहे. या दाव्याला दुजोरा देण्यासाठी संघटनेने हल्ल्याचा व्हिडिओही प्रसिद्ध केला आहे. मात्र, पाकिस्तानच्या लष्कराने या हल्ल्यांबाबत अद्याप सविस्तर माहिती जाहीर केलेली नाही.

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या दाव्यानुसार, जियारत क्रॉस परिसरात त्यांच्या ‘फतेह स्क्वॉड’ने पाकिस्तानी लष्कराच्या ताफ्यावर घात लावून हल्ला केला. या हल्ल्यात १८ जवान ठार झाले, तर दोन लष्करी वाहने नष्ट करण्यात आल्याचा दावा संघटनेने केला आहे. याशिवाय पाच जवान जखमी होऊन घटनास्थळावरून निसटल्याचेही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने म्हटले आहे. यानंतर सुराबमधील हाजिका परिसरात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या ‘स्पेशल टॅक्टिकल ऑपरेशन्स स्क्वॉड’ने (STOS) रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून वाहनाचा स्फोट घडवून आणल्याचा दावा करण्यात आला. या हल्ल्यात सात पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे संघटनेने म्हटले आहे.

हल्ल्यानंतर बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या अधिकृत माध्यम विभागाने ‘हक्कल’च्या माध्यमातून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. या व्हिडिओमध्ये पाकिस्तानी लष्कराची वाहने आगीत जळताना आणि सशस्त्र बलुचिस्तान लिबरेशन आर्मी सदस्य घटनास्थळी दिसत असल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दृश्यांमध्ये हल्ल्यानंतर लष्करी वाहनांमधून शस्त्रे ताब्यात घेतली जात असल्याचेही दिसते.

हे ही वाचा:

दिल्लीत रिपब्लिक चॅनेलच्या महिला पत्रकाराशी ‘कॉक्रोच’चे गैरवर्तन

S-400 खरेदीसाठी रशियासोबत ५० हजार कोटींची डील?

नेपाळमधील महाप्रलयातील मृतांचा आकडा १,३४४ वर

सहारनपूरमध्ये अनधिकृत मशिदीवर बुलडोझर

बलुचिस्तानमध्ये गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानी सुरक्षा दल आणि बलुच बंडखोरांमधील संघर्ष तीव्र झाला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीसह इतर बंडखोर संघटना लष्करी तळ, सुरक्षा दलांचे ताफे आणि महत्त्वाच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहेत. बलुच संघटना पाकिस्तानकडून होत असलेल्या कथित दडपशाहीला विरोध करत असून, बलुचिस्तानला अधिक स्वायत्तता किंवा स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा देण्याची मागणी करत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
333,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा