25 C
Mumbai
Tuesday, December 9, 2025
घरदेश दुनियाफॅक्टचेकर म्हणवणाऱ्या अल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरला बसला फटका

फॅक्टचेकर म्हणवणाऱ्या अल्ट न्यूजच्या मोहम्मद झुबेरला बसला फटका

जनम टीव्हीने फोटो हटवला

Google News Follow

Related

२७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र अँटी-टेररिझम स्क्वॉडने पुण्यातील ३५ वर्षीय आयटी व्यावसायिक झुबैर हंगरगेकर याला दहशतवादी संबंध असल्याच्या आरोपावरून अटक केली. पण त्या प्रकरणात अल्ट न्यूजचा सहसंस्थापक मोहम्मद झुबेरला फटका बसला.  अल-कायदा-समर्थक दहशतवादाबाबतच्या आपल्या न्यूजमध्ये केरळमधील मीडिया चॅनेल जनम टीव्हीने अल्ट न्यूजचा सह-संस्थापक मोहम्मद झुबेर यांचा फोटो झुबेर हंगरगेकरचा फोटो म्हणून वापरला.

एरवी प्रोपोगंडा करण्यासाठी वेगवेगळ्या पोस्ट तयार करणाऱ्या मोहम्मद झुबेरला यावेळी मात्र डिजिटल क्षेत्रातील चुकीचा परिणाम सहन करावा लागला.

यावर प्रतिक्रिया देताना, मोहम्मद झुबैरने एक्सवर पोस्ट करून जनम टीव्हीच्या तमिळ हँडलला टॅग करत विचारले की त्यांच्या जुन्या फोटोचा अल-कायदा-समर्थक दहशतवादी प्रकरणात का वापर केला गेला?

मोहम्मद झुबेरच्या पोस्टला प्रत्युत्तर देताना, तमिळ जनम टीव्हीचा डिजिटल प्रमुख आनंद टी. प्रसाद याने आपण चुकून मोहम्मद झुबेर यांचा फोटो वापरल्याचे मान्य केले. त्याने सांगितले की त्यांच्या टीममधील एका सदस्याने “Techie Terrorist Zubair” असा गूगल सर्च दिल्यानंतर त्या मोहम्मद झुबेरचा फोटो आला. त्यामुळे त्याने तो वापरला.

जनम टीव्हीच्या डिजिचल प्रमुखाने आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले की, “आमच्या जनम टीव्ही प्लॅटफॉर्मवर अलीकडे एक चूक झाली आहे ती आम्ही स्पष्ट करू इच्छितो. आज आम्ही झुबेर नावाच्या व्यक्तीच्या अटकेबाबत एक कार्ड प्रकाशित केले. दुर्दैवाने, त्या पोस्टमध्ये आम्ही चुकीने अशा व्यक्तीचा फोटो वापरला ज्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. कार्ड डिझाइन करताना आमच्या टीम सदस्याने ‘Techie Terrorist Zubair’ असे गूगलवर शोधले आणि ही चूक घडली,” असे प्रसाद यांनी लिहिले.

हे ही वाचा :

सीमा नियंत्रणाबाबत भारत- चीनमध्ये सक्रिय संवाद सुरू राहणार!

ममदानीने बेकायदेशीर परदेशी देणग्या घेतल्याचा आरोप

पाक संरक्षण मंत्री म्हणतात, “काबुल भारताची बाहुली झालाय!”

“भारत- पाकिस्तान संघर्षात सात नवीन, सुंदर लढाऊ विमाने पाडण्यात आली”

आगामी स्पष्टीकरणात त्यांनी सांगितले की, गूगलवर मिळालेला फोटो त्याच झुबेर हंगरगेकरचा असल्याचे वाटल्याने टीम सदस्याने योग्य पडताळणी न करता फोटो पोस्टमध्ये वापरला.

आनंद टी. प्रसाद यांनी पुढे सांगितले की या चुकांसाठी टीम डिझायनरशी चर्चा झाली असून भविष्यात अशा चुका होऊ नयेत यासाठी उपाययोजना केल्या आहेत. “या घटनेनंतर आम्ही संबंधित डिझायनरशी बोललो असून अशी चूक पुन्हा होऊ नये यासाठी पावले उचलली आहेत,” असे त्यांनी लिहिले.

यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, महाराष्ट्र एटीएसने पुण्यातील ३५ वर्षीय आयटी व्यावसायिक झुबैर हंगरगेकर याला दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून अटक केली. तो पुण्यातील कोंढवा परिसरातील रहिवासी आहे. अल-कायदा गटाशी संबंधित साहित्य बाळगल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. त्याचा मित्रही चौकशीसाठी अटक करण्यात आला, हे दोघे चेन्नईहून एका कार्यक्रमावरून परतल्यानंतर पुणे रेल्वे स्थानकात पकडले गेले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा