गेल्या काही दिवसांत होर्मुझ सामुद्रधुनी चर्चेच्या केंद्रस्थानी आली असून इराण आणि अमेरिका यांच्यात या समुद्री मार्गावरून संघर्ष शिगेला पोहचला आहे. जागतिक जलवाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा मार्ग इस्रायल- अमेरिका विरुद्ध इराण असा संघर्ष सुरू झाल्यापासून सातत्याने वादाच्या केंद्रस्थानी आहे. या मार्गाचा वापर करण्याची परवानगी देण्याबाबत वेळोवेळी अमेरिका आणि इराण यांनी आपापल्या भिन्न भिन्न भूमिका मांडल्या आहेत. अशातच आता या समुद्र मार्गाने एकाच दिवशी २० हून अधिक जहाजांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे.
जहाज वाहतूक विश्लेषण कंपनी केप्लरच्या आकडेवारीनुसार, शनिवारी २० हून अधिक जहाजांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास केला, जी १ मार्चनंतरची या जलमार्गातून प्रवास करणाऱ्या जहाजांची सर्वाधिक संख्या आहे. शनिवारी प्रवास केलेल्या जहाजांपैकी पाच जहाजांनी इराणमधून तेल उत्पादनांपासून ते धातूंपर्यंतचा माल भरला. त्यापैकी तीन द्रवीकृत पेट्रोलियम वायू वाहक जहाजे असून, एक चीनकडे आणि एक भारताकडे जात आहे.
संयुक्त अरब अमिरातीमधून एलपीजी घेऊन जाणारा पनामाचा ध्वज असलेला ‘क्रेव्ह’ हा टँकर इंडोनेशियाच्या दिशेने जात आहे. बहरीनमधून शुद्ध उत्पादने भरलेले तीनपैकी दोन टँकर – अक्ती ए आणि अथिना – अनुक्रमे मोझांबिक आणि थायलंडकडे जात आहेत. लायबेरियाचा ध्वज असलेला टँकर ‘नॅव्हिग8 मॅकॅलिस्टर’ संयुक्त अरब अमिरातीचा सुमारे ५००,००० बॅरल नॅफ्था दक्षिण कोरियातील उल्सान येथे पोहोचवत आहे. लायबेरियाचा ध्वज असलेले ‘व्हेरी लार्ज क्रूड कॅरियर एफपीएमसी सी लॉर्ड’ हे जहाज सुमारे २० लाख बॅरल सौदी कच्चे तेल घेऊन तैवानमधील मैलियाओ बंदराकडे जात आहे.
हे ही वाचा:
स्वराज्य स्पोर्टस् व श्रीराम क्रीडा विश्वस्तने पटकावला श्री मावळी मंडळ चषक
“तुम्ही आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली होती, आता गोळीबार का करता?”
निदा खान एचआर मॅनेजर नव्हती, पण प्रोसेस असोसिएट म्हणून काय करत होती?
चेकमेट-समेटचा प्रयोग काँग्रेसमध्ये रिजिम चेंज?
भारतीय ध्वज असलेले ‘देश गरिमा’ जहाज, संयुक्त अरब अमिरातीच्या दास क्रूड तेलाचे सुमारे ७,८०,००० बॅरल घेऊन श्रीलंकेकडे रवाना होत आहे. तर कतारचे खत घेऊन जाणारे ‘रुबी’ हे जहाज संयुक्त अरब अमिरातीकडे जात आहे. टँकर ‘मेरी एम’ सौदी अरेबियातून भरलेला पेट्रोलियम कोक इटलीमधील रॅव्हेना येथे घेऊन जात आहे.
