31 C
Mumbai
Saturday, April 25, 2026
घरस्पोर्ट्सस्वराज्य स्पोर्टस् व श्रीराम क्रीडा विश्वस्तने पटकावला श्री मावळी मंडळ चषक

स्वराज्य स्पोर्टस् व श्रीराम क्रीडा विश्वस्तने पटकावला श्री मावळी मंडळ चषक

 याशिका पुजारी, तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू

Google News Follow

Related

महिलांत स्वराज्य स्पोर्टस् आणि पुरुषांत श्रीराम क्रीडा विश्वस्त यांनी श्री मावळी मंडळाने आयोजित केलेल्या ७३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत अंतिम विजेतेपद मिळविले. स्वराज्य स्पोर्टस् ची याशिका पुजारी व श्रीराम क्रीडा विश्वस्तचा तुषार शिंदे स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले. दोन्ही खेळाडूंना प्रत्येकी रोख रु. पाच हजार(₹ ५०००/-) देऊन सन्मानित करण्यात आले.

ठाणे चरई येथील श्री मावळी मंडळाच्या भव्य पटांगणावर संपन्न झालेल्या महिलांच्या अत्यंत चुरशीने खेळला गेलेल्या अंतिम सामन्यात उपनगरच्या स्वराज्य स्पोर्टस् ने पूर्वार्धातील १३-१७ अशा पिछाडीवरून पालघर(विरार)च्या विवेक स्पोर्टस् चा प्रतिकार ३७-३३ असा मोडून काढत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार(₹५१०००/-) आपल्याकडे खेचून आणले. उपविजेत्या विवेकला रोख रु. एकतीस हजार(₹३१०००/-)व चषकावर समाधान मानावे लागले.

हरजीत, स्वीटी, सौंदर्या यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर विवेक स्पोर्टस् ने पूर्वार्धात लोण देत ४ गुणांची आघाडी मिळविली होती. पण उत्तरार्धात त्यांना आपल्या खेळात सातत्य राखणे जमले नाही. उत्तरार्धात याशिका पुजारी, समृद्धी मोहिते यांनी आपला खेळ गतीमान करीत चढाईत भराभर गुण घेत लोण ची परतफेड केली. त्यांना प्रतिक्षा तांडेलने उत्कृष्ट पकडी करीत छान साथ दिली. म्हणूनच शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणाऱ्या या सामन्यात स्वराज्यला सरशी साधता आली.

पुरुषांच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या श्रीराम क्रीडा विश्वस्त मंडळाने ठाण्याच्या ग्रीफिन्स जिम. चा ३६-३० असा पराभव करीत “श्री मावळी मंडळ चषक” व रोख रु. एकावन्न हजार(₹५१०००/-) आपल्या खात्यात जमा केले. उपविजेत्या ग्रीफिन्स जिम. ला चषक व रोख रु. एकतीस हजार(३१०००/-) वर समाधान मानावे लागले.

आक्रमक सुरुवात करीत पहिला लोण देत श्रीराम संघाने पहिल्या डावात २०-१२ अशी आघाडी घेत विजयाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले. दुसऱ्या डावात आणखी एक लोण देत आपल्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दुसऱ्या डावात मात्र ग्रीफिन्सने आपल्या खेळाची गती वाढवीत लोण ची परतफेड करीत गुणा मधील फरक कमी केला. पण संघाला विजयी करण्यात त्यांचा खेळ कमी पडला. तुषार शिंदे, अंकुश पारले यांच्या संयमी व धूर्त चढाया त्यांना अमित सिंग, आदित्य पारले यांची मिळालेली बचावाची साथ यामुळे हा विजय शक्य झाला. सुरज धुंदले, मनीष धनावडे, वेदान्त धामले, आदित्य पिलाणे यांनी दुसऱ्या डावात आपला खेळ उंचावत कडवी लढत दिली.

हे ही वाचा:

“तुम्ही आम्हाला पुढे जाण्याची परवानगी दिली होती, आता गोळीबार का करता?”

उत्तर कोरियाची पुन्हा क्षेपणास्त्र चाचणी; इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर तणाव वाढला

अल्पवयीन मुलीवर बलात्कार, परवेझ पठाणसह ८ जणांची पोलिसांनी काढली धिंड!

काँग्रेसने महिला हक्कांची भ्रूणहत्या केली!

या अगोदर झालेल्या महिलांच्या उपांत्य सामन्यात स्वराज्य स्पोर्टस् ने मिडलाईन अकॅडमी-नांदेडला ३८-२५ असे, तर विवेक स्पोर्टस् ने ओम् वर्तकनगरला ४४-१६ असे नमवीत अंतिम फेरी गाठली होती. पुरुषांत श्रीराम क्रीडाने डॉन बॉस्कोला ३५-१९ असे, तर ग्रीफिन्स जिम. ने ५-५ चढायात मिडलाईनला ३२-२९(७-४) अशी चूरशीची मात करीत अंतिम फेरीत धडक दिली होती.

महिलांत विवेकची स्वीटी आणि स्वराज्यची समृद्धी मोहिते यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून घोषित करण्यात आले. पुरुषांत ग्रीफिन्सचा मनीष धनावडे आणि श्रीरामचा अमित सिंग यांना अनुक्रमे स्पर्धेतील उत्कृष्ट चढाई आणि पकडीचे खेळाडू म्हणून जाहीर करण्यात आले. या चारही खेळाडूना प्रत्येकी रोख रु. तीन हजार(₹३०००/-) देऊन गौरविण्यात आले.

स्पर्धेच्या समारोपाच्या दिवशी निरंजन डावखरे (आमदार), संजय वाघुले (नगरसेवक), संदीप लेले (जिल्हाध्यक्ष ठाणे शहर भाजपा) ह्यांनी सदिच्छा भेट दिली. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण ठाणे जिल्हा कबड्डी असो. चे अध्यक्ष व ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष, सुधाकर मोरे, उपाध्यक्ष मनीष मुंदडा, चिटणीस रमण गोरे, उप चिटणीस संतोष सुर्वे, सहाय्यक चिटणीस चिंतामणी पाटील, विश्वस्त प्रभाकर सुर्वे, विश्वस्त कृष्णा डोंगरे, विश्वस्त पॅट्रिक फर्नांडीस, विशवस्त केशव मुकणे हे उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा