23.8 C
Mumbai
Monday, January 19, 2026
घरदेश दुनियामुंबईकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या परिषदेचे यजमानपद

मुंबईकडे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या परिषदेचे यजमानपद

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची १४० वी बैठक मुंबईत होणार आहे.तब्बल चाळीस वर्षानंतर  भारताला मिळाले यजमानपद मिळाले आहे. शनिवारी बीजिंगमध्ये झालेल्या १३९ व्या ऑलिम्पिक समितीच्या बैठकीत भारताने पुढील बैठकीचे यजमानपद मिळवले आहे.

या वेळी कोणत्याही देशाने भारताला विरोध केलेला नाही. २०२३ मध्ये, भारत दुसऱ्यांदा ऑलिम्पिक समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवणार आहे. यापूर्वी चाळीस वर्षांपूर्वी भारतात बैठक झाली होती. तर २०२३ ची बैठक प्रथमच मुंबईत होणार आहे.

भारताकडून अभिनव बिंद्रा, नरिंदर बत्रा आणि नीता अंबानी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या १३९ व्या बैठकीत सहभागी झाले होते. ऑलिम्पिकमध्ये एकेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा अभिनव हा भारताचा पहिला खेळाडू आहे. बत्रा भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा आहेत, तर नीता अंबानी भारतीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्य आहेत. भारताचे क्रीडा आणि युवा मंत्री अनुराग ठाकूरही या बैठकीला उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांचे या बैठकीत महत्त्वपूर्ण कामगिरी केल्याबद्दल ट्विट करून आभार मानले आहेत. ट्विट मध्ये, “२०२३ च्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटी सेशनचे आयोजन करणे ही मुंबईसाठी केवळ अभिमानाची गोष्ट नाही तर भारताला क्रीडा क्षितिजावर पुढे नेण्याची संधी देखील आहे. २०२३ चे सेशन मुंबई, महाराष्ट्राकडे आणण्याकरता श्रीमती नीता अंबानी यांचे आभार.” असे म्हणत मुख्यमंत्र्यानी आभार मानले आहेत.

हे ही वाचा:

शिवनेरीवर बाळ शिवबासाठी पाळणा जोजवला

‘छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत’

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम…..

रजनीश सेठ यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती

शेवटचा कार्यक्रम १९८३ मध्ये झाला होता त्यानंतर चार दशकांनंतर भारतात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अधिवेशन होणार आहे. सत्रात, आयओसी सदस्य ऑलिम्पिक चार्टर आणि ऑलिम्पिकच्या यजमान शहराची निवड यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
287,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा