28 C
Mumbai
Saturday, May 11, 2024
घरदेश दुनियाछत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ 'टॉप'

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ‘टॉप’

आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषदेच्या अहवालांत आले समोर

Google News Follow

Related

प्रवाशांसाठी विमानतळ म्हणजे फक्त प्रवास करणे एवढेच नसून प्रवाशांना उत्तम सुविधा देण्यास, आनंददायी प्रवास आणि विमानतळावरील सेवा या गुणवत्ता पण महत्वाच्या असतात. प्रवाशांच्या अनुभवावर आधारित जगातल्या सर्वोत्तम विमानतळांना  पुरस्कार देण्यात येतात. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘जगभरातील सर्वोत्तम विमानतळ’ चार कोटी प्रवासीसंख्या असल्यामुळे या एकमेव श्रेणीत हे विमानतळ आशियातील सर्वोत्तम ठरले आहे. आंतरराष्ट्रीय विमानतळ परिषद अर्थात एसीआय यांच्या अहवालात हि बाब समोर आली आहे.

नुकतीच एसीआयने आंतरराष्ट्रीय सर्वोत्तम अनुभव असलेल्या विमानतळाची मानांकन जाहीर केली आहेत. त्यात एकूण सहा श्रेणीचा विचार करण्यात आला आहे. जसे सर्वाधिक समर्पित कर्मचारी, सर्वाधिक आनंददायी विमानतळ, सर्वात सोपा विमानतळ प्रवास, आणि चौथे सर्वाधिक स्वच्छ विमानतळ या श्रेणी ठरवण्यात आल्या होत्या. दुर्दैवाने, या चारही श्रेणीमध्ये मुंबईचे नाही तर देशातील एकसुद्धा विमानतळ या चारही श्रेणीचा समावेश नसल्याचे दिसत आहे.

हे ही वाचा:

फ्लूने घेतले दोन बळी; भारतात कर्नाटक आणि हरियाणात नोंद

सतीश कौशिक यांचा मृत्यू संशयास्पद, दिल्ली पोलिसांना फार्म हाऊसमध्ये ही गोष्ट सापडली

थर्ड गिअर..२.९२ लाख कार्सची विक्री

वृक्षतोडीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जा, उच्च न्यायालयाने काढली याचिका निकाली

जागतिक स्तरावर बंगळूरचे विमानतळ हे सर्वोत्तम आगमनासाठीचे विमानतळ ठरले आहे. क्षेत्रनिहाय आणि प्रवासीसंख्या अशा विमानतळांना एसीआयने मानांकने दिलेली आहेत. यामध्ये वार्षिक चार कोटी प्रवासीसंख्या उपश्रेणीत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ आशियामध्ये सर्वोत्तम ठरले आहे. प्रवासाच्या दिवशी विमानतळावर जमलेल्या प्रवाशांच्या सर्वेक्षणाच्या आधारावर पुरस्कार ठरवले जातात.

एसीआयच्या मते २०२२ मध्ये गोळा करण्यात आलेल्या ४,६५,००० सर्वेक्षणाप्रमाणे जगभरातील ७५ विमानतळांनी एकूण १४४ पुरस्कार जिंकले आहेत. या सर्वेक्षणामध्ये ३० पेक्षा जास्त कार्य प्रदर्शन निर्देशांकाचा समावेश करण्यात आला आहे. उदाहरर्णार्थ , विमानतळावर तुमचा मार्ग शोधणे, चेक इन करणे, विमानतळावरील खरेदी किंवा , काही जेवणाच्या ऑफर्स असणे वगैरे यांचा यात समावेश असतो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
152,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा