26 C
Mumbai
Monday, December 8, 2025
घरदेश दुनियारशिया- युक्रेनमधील युद्धावर नरेंद्र मोदी तोडगा काढू शकतील

रशिया- युक्रेनमधील युद्धावर नरेंद्र मोदी तोडगा काढू शकतील

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी व्यक्त केला विश्वास

Google News Follow

Related

रशिया आणि युक्रेन यांच्यात गेली जवळपास अडीच वर्षे युद्ध सुरू आहे. अनेक प्रयत्नांनंतरही या दोन्ही देशांमधील युद्धावर तोडगा निघत नसल्याचे चित्र आहे. अशातच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या समस्येवर तोडगा काढू शकतील असा विश्वास युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी व्यक्त केला आहे. झेलेन्स्की यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना असा विश्वास व्यक्त केला.

झेलेन्स्की म्हणाले की, रशिया- युक्रेन युद्ध संपवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची मदत होऊ शकते. कोणत्याही वादविवादात किंवा युद्धात त्यांचा प्रभाव दिसून येतो. यातून भारताचा प्रभावही स्पष्ट दिसून येतो. त्यामुळे मोदीच हे युद्ध थांबवू शकतात. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी भारतात चर्चा होण्याची शक्यता झेलेन्स्की यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, अर्थातच हे भारतात होऊ शकते आणि पंतप्रधान मोदी हे प्रत्यक्षात करू शकतात. मला वाटते की आपण स्वतःला तयार करणे आणि त्यानुसार तयारी करणे आवश्यक आहे. कारण युद्ध आपल्या मातीवर लढले जात आहे. आमच्याकडे एक व्यासपीठ आहे, ते म्हणजे शांतता शिखर परिषद. त्यातून या गोष्टी घडवून आणल्या जाऊ शकतात.

हे ही वाचा:

जम्मू-काश्मीरमधील अखनूरमध्ये पुन्हा एकदा लष्कराच्या वाहनावर गोळीबार

सीमेपलीकडून होणारी घुसखोरी थांबेल तेव्हाच बंगालमध्ये शांतता नांदेल!

गुप्तांगात लपवून आणले १ किलो वजनी सोने, तपासणी करताच पितळ उघड!

वक्फ बोर्डाने शेतकऱ्यांच्या १२०० एकर जमिनीवर ठोकला दावा, शेतकरी म्हणाले, आम्ही जायचे कुठे?

गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियातील कझान शहरात आयोजित १६व्या ब्रिक्स परिषदेत भाग घेतला होता. यादरम्यान त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. या संभाषणात पीएम मोदींनी पुन्हा एकदा रशिया-युक्रेन युद्धाचा उल्लेख केला होता. शिवाय शांतता आणि स्थैर्य राखण्यासाठी भारत नेहमीच पाठीशी असेल विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा