25 C
Mumbai
Monday, July 22, 2024
घरदेश दुनियानीरज चोप्रा जगज्जेता

नीरज चोप्रा जगज्जेता

जागतिक एथलेटिक्सच्या अंतिम फेरीत मिळविले सुवर्णपदक, ८८.१७ मीटर केली फेक

Google News Follow

Related

भारताचा स्टार खेळाडू नीरज चोप्राने कमाल करून दाखविली. जागतिक अजिंक्यपद ऍथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक प्रकारात त्याने सुवर्णपदक जिंकण्याचा पराक्रम केला. रात्री उशिरा झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम फेरीत त्याने ८८.१७ मीटर इतकी फेक करत ही स्पर्धा जिंकली. बुडापेस्ट, हंगेरी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १२ जणांच्या अंतिम फेरीत नीरजने आपले वर्चस्व सिद्ध केले. या कामगिरीमुळे जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. शिवाय, ऑलिम्पिक सुवर्ण आणि जागतिक सुवर्ण जिंकणाराही तो एथलेटिक्समधला भारताचा पहिलाच खेळाडू आहे. डायमण्ड ट्रॉफीही त्याच्या नावावर आहे.

 

 

नीरजला आपल्या पहिल्या प्रयत्नात मोठी फेक करू शकला नाही पण दुसऱ्या प्रयत्नात त्याने ८८.१७ मीटर इतकी फेक केली आणि तीच त्याच्या सुवर्णपदकासाठी उपयुक्त ठरली. पाकिस्तानचा अर्शद नदीमला रौप्यपदक मिळाले. त्याने ८७.८२ मीटर फेक केली. जाकुब वाल्देचकडून नीरजला आव्हान होते पण त्याला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. त्याने ८६.६७ मीटर इतकी फेक केली.

 

हे ही वाचा:

भारताच्या पुरुष ऍथलेटिक्स संघाने विक्रमी वेगाने अंतिम फेरीत मारली धडक

ऑनलाइन काम करणाऱ्यांना आम्ही लाइनवर आणले!

भारत चंद्रावर पोहोचला, आम्ही मात्र मध्येच अडकलोय…पाकिस्तान टीव्हीवर चर्चा

आदित्य एल-१ मोहीम उलगडणार सूर्याचे कोडे

भारताचे आणखी दोन स्पर्धक या अंतिम फेरीत होते. त्यामुळेही भारताच्या ऐतिहासिक कामगिरीकडे लक्ष होते. पण किशोर जेनाला ८४.७७ मीटरसह पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले तर डीपी मनूला ८४.१४ मीटरसह सहावे स्थान मिळाले. पण दोघांनीही वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरी करून दाखविली. प्रथमच भारताचे तीन खेळाडू भालाफेक प्रकाराच्या अंतिम फेरीत धडकले होते.

 

 

ऑलिम्पिकमध्ये नीरजने पहिल्याच प्रयत्नात सुवर्णपदक विजेती फेक करत कमाल केली होती. मात्र यावेळेला त्याला पहिल्या प्रयत्नात ते साधता आले नाही. जागतिक एथलेटिक्स स्पर्धेत भारताचे हे तिसरे पदक ठरले आहे.

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
166,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा