29.9 C
Mumbai
Thursday, October 22, 2026
घरदेश दुनिया‘अमेरिकेत खलिस्तानी आंदोलनाला स्थान नाही’

‘अमेरिकेत खलिस्तानी आंदोलनाला स्थान नाही’

भारतीय वंशाचे अमेरिकी शीख नेत्याची स्पष्टोक्ती

Google News Follow

अमेरिका आणि भारत या देशांमध्ये सध्या खलिस्तानींचा मुद्दा चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय वंशाचे अमेरिकी शीख नेता दो टूक यांनी ‘अमेरिकेत खलिस्तानी आंदोलनाला कोणतेही स्थान नाही आणि आम्ही त्याचे समर्थन करत नाही,’ असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले.

अमेरिकी सरकार असो वा शीख समुदाय… कोणीही या आंदोलनाचे समर्थन करत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘मोदी सरकार आणि शीखांचे संबंध कोणापासून लपून राहिलेले नाहीत. मोदी यांनी या समुदायासाठी जे केले, ते अतुलनीय आहे,’ असे शीख ऑफ अमेरिका ऑर्गनायझेशनचे जस्सी सिंग यांनी स्पष्ट केले.

हे ही वाचा:

बडतर्फ पोलीस अधिकारी सुनील मानेचा जामीन अर्ज फेटाळला

हरयाणा करणार इस्रायलसाठी १० हजार कुशल कामगारांची भरती

महिला न्यायाधीशाची मुख्य न्यायाधीश चंद्रचूडांकडे इच्छामरणाची मागणी!

अदानी समूहाविरोधात उद्या ठाकरे गटाचा धारावीत मोर्चा!

‘पंतप्रधान मोदी यांनी शीख समाजासाठी जे केले, त्याबाबत कोणतीही शंका उपस्थित करण्यास वाव नाही. अन्य सरकारांच्या तुलनेत मोदी सरकारने शीख समाजासाठी चांगले काम केले आहे. मात्र शीख समाजाशी संबंधित अनेक मुद्दे आहेत, त्यावर तोडगा काढणे आवश्यक आहे. यामध्ये सन १९८४मध्ये शीख समाजावर झालेल्या अत्याचारांचाही समावेश आहे. ते अत्याचार कोणताही शीख विसरू शकत नाही,’ असे जस्सी सिंग यांनी स्पष्ट केले.

मोजक्यांचेच आंदोलनाला समर्थन

शीख समुदायातील मोठा गट खलिस्तानी आंदोलनाचे समर्थन करत नाही. भारत आणि अमेरिकेतील मोजकेच जण या आंदोलनाचे समर्थन करतात. शीख नेता गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येच्या कटात एका भारतीय नागरिकाचा सहभाग असल्याबाबत जस्सी सिंग यांना विचारले असता, याचा अमेरिका आणि भारत यांच्या नातेसंबंधांवर दीर्घकालीन परिणाम होणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.

पन्नू याच्या हत्येच्या कटात भारतातील सरकारी अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. भारत आणि अमेरिकेचे संबंध खूप मजबूत आहेत. दोन्ही देश एकमेकांची गरज आहे. त्यामुळे या प्रकरणी स्वतंत्र चौकशी करून दोषींना लवकरात लवकर पकडावे, अशी मागणी सिंग यांनी केली.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
339,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा