बांगलादेशचे अंतरिम प्रमुख मुहम्मद युनूस यांनी पुन्हा एकदा भारताला ईशान्येकडील प्रदेशाच्या मुद्द्यावरून डिवचले आहे. युनूस यांनी एका पाकिस्तानी जनरलला आसाम आणि इतर ईशान्येकडील राज्यांना बांगलादेशचा भाग म्हणून दर्शविणारा वादग्रस्त नकाशा सादर केला आहे. १९७१ च्या मुक्ती युद्धापासून ऐतिहासिकदृष्ट्या ताणलेल्या या दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये वाढ होत असताना, पाकिस्तानी लष्कराचे सर्वोच्च जनरल साहिर शमशाद मिर्झा यांनी ढाक्याचा दौरा करत युनूस यांची भेट घेतली.
रविवारी युनूस यांनी पाकिस्तानी जनरलसोबतच्या भेटीचे फोटो ट्विट केले. युनूस यांनी मिर्झा यांना ‘आर्ट ऑफ ट्रायम्फ’ नावाचे पुस्तक भेट दिल्याचे फोटोमध्ये दिसले. या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर बांगलादेशचा वादग्रस्त नकाशा होता, त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. या नकाशात भारताची सात ईशान्येकडील राज्ये बांगलादेशच्या भूभागाचा भाग म्हणून दाखवण्यात आली आहेत. जी कट्टरपंथी इस्लामी गटांच्या “ग्रेटर बांगलादेश”च्या आवाहनाशी सुसंगत आहे. या पोस्टनंतर, सोशल मीडियावर बांगलादेशच्या अंतरिम प्रमुखांवर भारताच्या सार्वभौम क्षेत्रात बिनबोभाटपणे घुसल्याबद्दल टीका करण्यात आली. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने अद्याप या वादावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा :
भारताचे पुढील सरन्यायाधीश होणारे न्यायमूर्ती सूर्यकांत कोण आहेत?
पाक लष्कराचे सर्वोच्च जनरल मुहम्मद युनूस यांच्या भेटीला; चर्चेत दडलंय काय?
भारतात वॉन्टेड असलेला झाकीर नाईक पाकिस्ताननंतर करणार बांगलादेशचा दौरा
ब्रिटनमधील वेस्ट मिडलँड्समध्ये भारतीय वंशाच्या महिलेवर बलात्कार
ऑगस्ट २०२४ मध्ये युनूस यांनी पदभार स्वीकारल्यापासून बांगलादेश- पाकिस्तान संबंधांमध्ये जवळीक आली आहे. दरम्यान, युनूस यांनी भारताच्या ईशान्येकडे लक्ष वेधण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांत, युनूस यांनी परराष्ट्र दौऱ्यांमध्ये भारताच्या “भूपरिवेष्टित” ईशान्येकडील राज्यांचा वारंवार उल्लेख केला आहे. एप्रिलमध्ये चीनच्या पहिल्याच भेटीत, युनूस यांनी ईशान्य भारत “भूपरिवेष्टित” असल्याने बांगलादेश हा या प्रदेशासाठी महासागराचा एकमेव संरक्षक आहे असा दावा केला होता. तसेच त्यांनी चीनला या प्रदेशात आपला प्रभाव वाढवण्यास आणि त्यांची अर्थव्यवस्था मजबूत करण्यास प्रोत्साहित केले.







