पाकिस्तानचे जमियत उलेमा-ए-इस्लाम (जेयूआय-एफ) प्रमुख मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्कराला घराचा आहेर देत देशातील वाढत्या दहशतवादाच्या मुद्द्यांवरून सुनावले आहे. अफगाणिस्तानातून एकही डाळिंब इस्लामाबादमध्ये प्रवेश करू शकत नाही, तरीही दहशतवादी देशात प्रवेश कसे करत आहेत, असे म्हणत मौलाना फजलुर रहमान यांनी पाकिस्तान सरकारसह लष्करावर खोचक टीका केली. अफगाणिस्तानातून दहशतवादी देशात घुसत असल्याचा पाकिस्तान वारंवार दावा करत असताना, रावळपिंडी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना रहमान यांनी हे विधान केले.
मौलाना फजलुर रहमान म्हणाले की, पाकिस्तानचे नागरिक देशाच्या धोरणकर्त्यांना विचारू इच्छितात की, झहीर शाहपासून ते आजच्या अमरत-ए-इस्लामीयाहपर्यंत कोणीही पाकिस्तानसोबत काम का करू शकले नाही? वेगवेगळे लोक आले, कम्युनिस्ट सरकार आले, जिहादींच्या नेतृत्वाखालील सत्ता आली, तालिबानची राजवट आली आणि पाकिस्तान समर्थकही आले. तरीही, टीका करण्यापूर्वी, तुम्ही कधी विचार केला आहे का की गेल्या ७८ वर्षांपासून पाकिस्तानचे अफगाण धोरण का अपयशी ठरत आहे?
अधिकारी म्हणत आहेत की दहशतवादी अफगाणिस्तानातून पाकिस्तानात येतात. जर ते येत असतील तर त्यांना थांबवा, त्यांना संपवा. अफगाण सरकारने तुमच्या हालचालींवर कधीही आक्षेप घेतलेला नाही, असे रहमान म्हणाले. पुढे त्यांनी म्हटले की, विचित्र गोष्ट अशी आहे की अफगाणिस्तानातून एकही डाळिंब किंवा खरबूज पाकिस्तानात प्रवेश करू शकत नाही, आणि तरीही दहशतवादी देशात येतात. रहमान यांनी पाकिस्तानच्या व्यापक परराष्ट्र धोरणावर टीका केली आणि ते पूर्णपणे अपयश असल्याचे वर्णन केले. ते म्हणाले की इस्लामाबादची राजनैतिकता देशासाठी विनाशकारी सिद्ध झाली आहे.
हे ही वाचा:
इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमाने सुरक्षा मर्यादा ओलांडल्यास लष्करी कारवाई करणार
“डीके शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपद द्या”
बांगलादेशसाठीचा टॅरिफ फास शिथिल! कर शुल्क १९% पर्यंत केले कमी
पंजाबमध्ये वर्गातच विद्यार्थिनीला घातली गोळी
“आम्ही भारताशी लढत आहोत, अफगाणिस्तानशी आमचा तणाव आहे, चीन अस्वस्थ आहे आणि इराणही नाराज आहे. हे जे काही आहे ते म्हणजे देशाचा नाश करणे आहे,” अशी टीका मौलाना फजलुर रहमान यांनी केली आहे. इस्लामाबादमधील शिया मुस्लिम मशिदीत झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर रेहमान यांचे हे विधान आहे, ज्यामध्ये किमान ३१ लोकांचा मृत्यू झाला. या स्फोटात १७० हून अधिक जण जखमी झाले.







