28 C
Mumbai
Sunday, February 8, 2026
घरदेश दुनियाअणुहल्ल्याची धमकी देण्याची पाकची जुनी सवय, आंतरराष्ट्रीय समुदायाने अर्थ काढावा!

अणुहल्ल्याची धमकी देण्याची पाकची जुनी सवय, आंतरराष्ट्रीय समुदायाने अर्थ काढावा!

असीम मुनीर यांच्या धमकीवर भारताची प्रतिक्रिया

Google News Follow

Related

पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी अमेरिकेच्या भूमीवरून दिलेल्या अणुहल्ल्याच्या धमकीवर भारत सरकारने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. भारताने केवळ पाकिस्तानलाच नव्हे तर अमेरिकेलाही आरसा दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. असीम मुनीर यांच्या धमकीवर, परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आणि म्हटले, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान केलेल्या विधानाकडे आमचे लक्ष वेधले गेले आहे. अणुहल्ल्याची धमकी देणे ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. पाकिस्तानच्या अशा बेजबाबदार विधानांकडे लक्ष देऊन आंतरराष्ट्रीय समुदाय निष्कर्ष काढू शकतो. पाकिस्तान केवळ प्रादेशिक सुरक्षेसाठीच नाही तर जागतिक सुरक्षेसाठीही धोका आहे.

भारत सरकारने म्हटले, एका मित्र राष्ट्राच्या भूमीवरून अशी विधाने केली जाणे हे देखील खेदजनक आहे. भारताने आधीच स्पष्ट केले आहे की ते अणु ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही. आम्ही आमच्या राष्ट्रीय सुरक्षेचे रक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व पावले उचलत राहू.

इंडिया टुडेच्या बातमीनुसार, यापूर्वी, भारत सरकारशी संबंधित सरकारी सूत्रांनी सिम मुनीर यांचे अणु धोक्याशी संबंधित विधान अत्यंत बेजबाबदार म्हटले होते आणि ते फेटाळून लावले होते. सरकारचे म्हणणे आहे की अशा विधानांमुळे पाकिस्तान प्रादेशिक आणि जागतिक सुरक्षा धोक्यात आणत आहे. यामुळे जगाला पाकिस्तानच्या अणु क्षमतेबद्दल चिंता वाटली पाहिजे.

हे ही वाचा : 

विद्यार्थिनीची गोळी घालून केली हत्या

बलूचिस्तानने साजरा केला ७८ वा स्वातंत्र्यदिन

एका माणसामुळे देशाला नुकसान सहन करावे लागणार नाही

मुंबईत उद्यापासून आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलंपियाड

दरम्यान, मुनीर यांच्या अणुहल्ल्याच्या धमकीनंतर त्यांच्यावर भारतातून टीका केली जात आहे. असीम मुनीर हे पाक लष्कर प्रमुख नसून दहशतवादी नेते असल्याचे भाजपा नेते हेमांग जोशी यांनी म्हटले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा