34 C
Mumbai
Saturday, April 25, 2026
घरराजकारणएवढं भरभरून मतदान की, बंगालमध्ये पळून गेलेली बायको नवऱ्याला सापडली!

एवढं भरभरून मतदान की, बंगालमध्ये पळून गेलेली बायको नवऱ्याला सापडली!

Google News Follow

Related

पश्चिम बंगालमध्ये २३ एप्रिलला भरघोस मतदान झाले. आतापर्यंतचे सर्वाधिक मतदान म्हणून याची नोंद होईल. या मतदानाचा राजकीय फायदा कुणाला कसा होईल माहीत नाही, पण एका नवऱ्याला मात्र नक्कीच झाला. त्याची पळून गेलेली बायको मतदानकेंद्रावर सापडली.

ही कहाणीच मुळात मजेशीर आहे. फासीदेवा येथील ताराबारी येथे एका मतदान केंद्राबाहेर हा सगळा प्रकार घडला. हे ठिकाण मातिगारा नक्षलबारी मतदारसंघात, सिलिगुडी उपविभागात येते.

तो व्यक्ती तिथे तब्बल पाच तास वाट बघत थांबलेला होता. कारण दोन वर्षांपूर्वी त्याची पत्नी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली होती, ती मतदानासाठी येईल असा त्याचा अंदाज होता. सकाळी लवकर, ताराबारी प्राथमिक शाळेजवळ लोकांनी त्याला शांतपणे उभे राहिलेले पाहिले. तो कोणाशीही बोलत नव्हता. तो घामाने भिजला होता, तरीही तो हलला नाही. तासन्‌तास तो मतदान केंद्राजवळच थांबून राहिला.

हे ही वाचा:

कच्च्या तेलाच्या दरात अस्थिरता; ब्रेंट १०५ डॉलरवर स्थिर

महाराष्ट्राचे लक्ष्य ३० लाख कोटी

३१ वर्षांपूर्वीच्या अपहरण, हत्येच्या प्रकरणात एक्स मुस्लिम सलीम वास्तिकला अटक

इस्तांबुलमधून दाऊदचा निकटवर्तीय सलीम डोला अटकेत

…मग आली त्याची पत्नी

दुपारी सुमारे २ वाजता एक महिला मतदानासाठी आली. तेव्हा तो माणूस हलला आणि तिच्याकडे जाऊ लागला. तो तिच्याजवळ पोहोचल्यावर त्याने तिचे केस ओढले आणि मागून तिला पकडले. दोघांमध्ये झटापट सुरू झाली. त्यानंतर केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे कर्मचारी त्वरित हस्तक्षेपासाठी पुढे आले. अधिकाऱ्यांनी त्या महिलेला सोडवले, तर तो माणूस ओरडत आणि शिवीगाळ करत राहिला.

विशेष पुनरावलोकनामुळे सामना

नंतर समजले की ती महिला त्याचीच पत्नी होती, जी दोन वर्षांपूर्वी दुसऱ्या पुरुषासोबत पळून गेली होती. त्याने असा अंदाज बांधला होता की, विशेष सखोल पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेमुळे मतदारांना आपले नाव मतदारयादीतून वगळले जाण्याची भीती असल्यामुळे ती मतदान केंद्रावर येईल, असा त्याचा अंदाज होता.

त्या व्यक्तीने सुरक्षा कर्मचाऱ्यांना विनंती केली की, तिच्या मतदार ओळखपत्रावरून त्या पुरुषाचे नाव पती म्हणून काढेपर्यंत तिला मतदान करू देऊ नये. मात्र अधिकाऱ्यांनी त्या महिलेला सुरक्षितपणे मतदान करू दिले आणि नंतर तिला त्या परिसरातून सुरक्षितपणे बाहेर सोडले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
304,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा