पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांनी भारताला दिलेल्या अणु धमकीवर भाजप नेते हेमांग जोशी यांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. असीम मुनीर हे पाकिस्तानचे लष्करप्रमुख नसून दहशतवादी नेता असल्याचे हेमांग जोशी यांनी म्हटले आहे.
एएनआयशी संवाद साधताना जोशी म्हणाले, “ते लष्करप्रमुख नाही, तर दहशतवादी नेता आहेत. त्याची वक्तव्यं नेहमी भारत-पाकिस्तानमधील तणाव वाढवण्याचं काम करतात. त्यांच्या वक्तव्यानंतर तणाव निर्माण झाल्याच्या अनेक घटना आहेत. पण मला असं वाटतं की ते अशा प्रकारचे प्रयत्न करतील, तेव्हा भारत याला योग्य उत्तर देईल. त्यांनी कधीही भारताच्या क्षमतेला कमी लेखण्याचा प्रयत्न करू नये.”
दरम्यान, अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेल्या पाक लष्कर प्रमुख मुनीर यांनी भारताला अणुहल्ल्याची धमकी दिली. भारताकडून अस्तित्वाचा धोका निर्माण झाल्यास इस्लामाबाद “अर्धे जग नष्ट करेल”. अणुशक्तीसंपन्न राष्ट्र असल्याने आम्ही खाली जातोय असे वाटल्यास अर्धे जग आपल्यासोबत घेऊन जाऊ, असे असीम मुनीर म्हणाले.
हे ही वाचा :
सोमवारी अक्षरा सिंह महादेव भक्तीत तल्लीन
रॅपर वेदान विरुद्ध लुकआउट नोटीस जारी
पोलिसांनी विरोधी खासदारांना घेतले ताब्यात
तसेच सिंधू नदीवर धरण बांधल्यास ते उडवून टाकण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. “आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहू आणि जेव्हा ते बांधतील तेव्हा ते दहा क्षेपणास्त्रांनी नष्ट करू. सिंधू नदी ही कोणत्याही भारतीय कुटुंबाची मालमत्ता नाही… आमच्याकडे क्षेपणास्त्रांची कमतरता नाही, अलहमदुलिल्लाह,” असे मुनीर म्हणाले.
#WATCH | Delhi: On Pakistan Army Chief Asim Munir’s nuclear threat against India, BJP leader Hemang Joshi says, "He is not an army chief but a terrorist leader. His statements always work to increase tension between India and Pakistan. We have also seen many incidents occur after… pic.twitter.com/CINJkc63Yu
— ANI (@ANI) August 11, 2025







