‘ऑपरेशन सिंधू’: इस्रायलमधून ३२६ भारतीय नागरिक परतले!

परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले, परदेशातील भारतीयांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता

‘ऑपरेशन सिंधू’: इस्रायलमधून ३२६ भारतीय नागरिक परतले!
इस्रायल-इराण तणावाच्या काळात, ऑपरेशन सिंधू अंतर्गत भारतीय नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत आणण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मंगळवारी ( २४ जून) सकाळी इस्रायलमधून ३२६ भारतीय नागरिकांना घेऊन हवाई दलाची दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचली. पहिल्या विमानात १६१ भारतीय नागरिकांना आणि दुसऱ्या विमानात १६५ भारतीय नागरिकांना आणण्यात आले. केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री (एमओएस) पवित्रा मार्गेरिटा आणि केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी विमानतळावर भारतीय नागरिकांचे स्वागत केले. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, परदेशात भारतीय नागरिकांची सुरक्षा ही सरकारची प्राथमिकता आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी ट्विट केले की, ऑपरेशन सिंधूचा इस्रायल टप्पा २३ जून रोजी सुरू झाला. यामध्ये १६१ भारतीय नागरिकांची पहिली तुकडी जॉर्डनहून घरी परत आणण्यात आली. त्यानंतर, हवाई दलाच्या सी-१७ विमानाने इस्रायलहून १६५ प्रवाशांना परत आणले.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, इस्रायलहून भारतात त्यांचा प्रवास जमिनीच्या सीमेवरून आणि नंतर हवाई मार्गाने केला जाईल. यापूर्वी, मशहादहून नवी दिल्लीत पोहोचलेल्या एका विशेष विमानाने २९२ भारतीय नागरिकांना इराणमधून बाहेर काढण्यात आले होते. आतापर्यंत २२९५ भारतीय नागरिकांना इराणमधून भारतात आणण्यात आले आहे.
इस्रायलहून परतलेल्या एकाने सांगितले की, मी दीड महिन्यापासून इस्रायलमध्ये होतो. तिथे अचानक परिस्थिती बिकट झाली आणि दिवसाच्या कोणत्याही वेळी आम्हाला स्फोटांचे आवाज ऐकू येत होते. आम्ही घाबरलो होतो. आता आम्ही परत आलो आहोत. आम्ही पंतप्रधान मोदींचे खूप आभारी आहोत.
हे ही वाचा : 
इराण-इस्रायल संघर्ष: “युद्धविराम आता लागू झालाय, कृपया तो मोडू नका!”
अमेरिकीच्या हवाई तळांवर हल्ल्यानंतर इराणमध्ये जल्लोष!
त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय!
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही!
आणखी एका भारतीयाने म्हटले की आम्हाला घरी परत आणल्याबद्दल आम्ही सरकारचे आभार मानतो. भारतीय दूतावासाकडून आम्हाला खूप मदत मिळाली. मी भारत सरकार आणि भारतीय हवाई दलाचा आभारी आहे. भारतीय दूतावास आणि भारत सरकारने आम्हाला निर्वासन प्रक्रियेदरम्यान खूप मदत केली.
भारतीय हवाई दलाने म्हटले आहे की पश्चिम आशियातील संघर्षग्रस्त भागात वाढत्या तणावाला प्रतिसाद म्हणून, भारतीय हवाई दलाच्या सी-१७ विमानांनी जॉर्डन आणि इजिप्तमधून भारतीय नागरिक आणि मित्र देशांच्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी मोहिमा सुरू केल्या आहेत.
Exit mobile version