इराणमधून यावेळी मोठी बातमी समोर आली आहे. इराणने अमेरिकेविरुद्ध मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई केली आहे. इराणने कतार आणि इराकमधील अमेरिकन हवाई तळांवर हल्ला केला आहे. इराणने कतारच्या अल उदेद हवाई तळावर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली आहेत, तर इराकच्या ऐन अल असद हवाई तळावर हल्ला केला आहे. विशेष म्हणजे, कतारमधील अल उदेद हवाई तळ हा पश्चिम आशियातील सर्वात मोठा अमेरिकन लष्करी तळ आहे. दरम्यान, अमेरिकीच्या हवाई तळांवर हल्ल्यानंतर इराणमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. सुप्रीम लीडर खामेनी यांच्या समर्थकांकडून जल्लोष करण्यात येत आहे.
अमेरिकी हवाई तळांवर इराणचा हल्ला होताच खामेनी यांच्या समर्थकांनी रस्त्यावर गाड्या काढत आनंद साजरा केला. तेहरानच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात लोकांनी दोन आणि चार चाकी गाड्या, सोबत झेंडे घेवून रॅली काढली. यावेळी मोठ्या प्रमाणात लोक रस्त्यावर दिसले. याचे व्हिडीओ देखील समोर आले आहेत. व्हिडीओमध्ये खामेनी यांच्या समर्थकांमधला उत्साह दिसून आला.
दरम्यान, इराणी सैन्य आणि इराणच्या सरकारी टीव्हीने या हल्ल्याची पुष्टी केली आहे. इराणने कतारवरील या कारवाईला ‘बशैर अल फतेह’ असे नाव दिले आहे. अमेरिकेविरुद्ध इराणने केलेली ही एक मोठी प्रत्युत्तरात्मक कारवाई मानली जात आहे.
बहरीन आणि सीरियामध्येही सायरन वाजत आहेत आणि आवाज ऐकू येत आहेत, अशा बातम्या येत आहेत. लोक घाबरले आहेत आणि गेल्या काही तासांत युद्धाची ठिणगी कतार आणि इराकमध्येही पोहोचल्याचे म्हटले जात आहे. सुरुवातीला हे प्रकरण इराण आणि इस्रायलपुरते मर्यादित असताना, आता अमेरिकेनेही त्यात प्रवेश केला आहे. “सायरन वाजला आहे. नागरिकांना आणि रहिवाशांना शांत राहण्याचे आणि जवळच्या सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे,” असे बहरीन सरकारच्या गृह मंत्रालयाने ट्विट केले. इराणच्या या हल्ल्यानंतर अमेरिका सक्रिय झाली आहे. अमेरिकेने इराणची क्षेपणास्त्रे पाडण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. याशिवाय अमेरिकन पॅट्रियट क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली सक्रिय करण्यात आली आहे.
हे ही वाचा :
कतारमधील अमेरिकेच्या तळांवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला
ख्रिस्ती हा ख्रिस्ती असतो, मुस्लिम हा मुस्लिम असतो, पण हिंदू हा जातीयवादी कसा?
एसटीला १०,३२२ कोटींचा संचित तोटा, पण नफ्यात आणणार!
डीएस्कलेटची बोंब ठोका, थोडे रडा, थोडे पॉपकॉर्न खा…
दरम्यान, भारताने कतारमधील आपल्या नागरिकांसाठी सल्लागार जारी केला आहे. भारताने म्हटले आहे की, ‘सध्याची परिस्थिती पाहता, कतारमधील भारतीय समुदायाला सतर्क राहण्याचे आणि घरात राहण्याचे आवाहन केले जाते. कृपया शांत रहा आणि कतारच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या स्थानिक बातम्या, सूचना आणि मार्गदर्शनाचे पालन करा. दूतावास आमच्या सोशल मीडिया चॅनेलद्वारे देखील अपडेट करत राहील.’
ईरान में जश्न मना रहे लोग!
अमेरिकी एयरबेस पर हमले के बाद ईरान में जश्न का माहौल!
खामनेई के समर्थक तेहरान की सड़कों पर निकल कर जश्न मना रहे हैं। pic.twitter.com/0uxD2Ha2bv
— Panchjanya (@epanchjanya) June 23, 2025
