आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी रविवारी “नकली धर्मनिरपेक्षतावाद्यां” वर जोरदार टीका केली. त्यांनी म्हटले की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सतत हिंदू धर्मावरच हल्ले केले जातात, आणि हे थांबवले गेले नाही तर आपला धर्म टिकवणे कठीण होईल. तामिळनाडूतील एका भव्य सभेत बोलताना पवन कल्याण यांनी आक्रमक भाषण केले.
कल्याण म्हणाले की, “ख्रिस्ती ख्रिस्ती असू शकतो, मुस्लिम मुस्लिम असू शकतो, पण हिंदू जर हिंदू असला तर त्याला ‘जायीतवादी’ म्हटलं जातं. हीच त्यांची बनावट धर्मनिरपेक्षता आहे,” असे कल्याण म्हणाले. त्यांनी ‘मुरुगा भक्तर्गल मानाडु’ या तमिळनाडूमधील श्रद्धांळूंच्या भव्य संमेलनात भाषण करताना हे वक्तव्य केले. तुमच्या श्रद्धेवर आम्ही प्रश्न करत नाही, मग आमच्या श्रद्धेवर तुम्ही का करताय?” असा सवालही त्यांनी केला.
हे ही वाचा:
आणीबाणी म्हणजे पत्रकारितेची मुस्कटदाबी
बुमराह म्हणजे टीम इंडियाचा खरी ‘संपत्ती’, त्याला माहीतय विकेट कशा काढायच्या!
मुख्याध्यापक वडिलांनी दिली मुलीला ‘जीवघेणी शिक्षा’
दीपस्तंभ फाउंडेशन मनोबल आता दिल्लीत!
हिंदू धर्मावरच लक्ष का?
“धर्मनिरपेक्षता म्हणजे सर्व धर्मांना सारखं वागवणं. पण आज ही धर्मनिरपेक्षता म्हणजे बाकी धर्मांवर टीका नाही, फक्त हिंदू धर्मावरच टीका.’ पवन कल्याण यांनी म्हटले की, अनेक निरीश्वरवादी (atheists) फक्त हिंदू देवतांवरच विश्वास ठेवत नाहीत, इतर धर्मांवर प्रश्न विचारत नाहीत.
“मुरुगा मानाडू वर प्रश्न का?”
एका राजकीय पक्षाच्या नेत्याने विचारले की, “मुरुगा मानाडू तामिळनाडूमध्येच का? उत्तर प्रदेश किंवा गुजरातमध्ये का नाही?” यावर कल्याण म्हणाले, “अशी प्रश्न विचारणे समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न आहेत.” “आज मुरुगावर प्रश्न विचारला जात आहे, उद्या शिव किंवा अम्मन देवीवरही प्रश्न विचारले जातील. ही विचारसरणी अत्यंत धोकादायक आहे.”
स्वातंत्र्याचा गैरवापर
अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही घटनेने दिलेले मोठे शस्त्र आहे. पण तिचा वापर हिंदू देवतांना टार्गेट करण्यासाठी होतोय, हे चुकीचं आहे, असं कल्याण यांनी स्पष्टपणे सांगितलं.
तामिळनाडूतील भाजपाचे नेते के. अन्नामलाई यावेळी म्हणाले की, “आम्ही कोणाचे शत्रू नाही, पण आमच्या हक्कांसाठी लढतोय. आमची हिंदू संस्कृती नष्ट होऊ देता कामा नये. जबरदस्ती धर्मांतर थांबले पाहिजे.”
भाजपाचे तामिळनाडूतील अध्यक्ष नयनार नागेत्रन यांनी सांगितले की, “तमिळ आणि तेलुगू, तसेच तमिळ आणि मल्याळम संस्कृतींना एकत्र आणण्याचा प्रयत्न या मानाडूमधून सुरू आहे.”
कार्यक्रमातील ठळक बाबी:
कार्यक्रमात अनेक हिंदू संघटनांचे, मठांचे, आणि भाजप-एआयएडीएमके नेत्यांचे सहभाग. शेवटी ‘कंद शष्ठी कवचम्’ चा एकत्रित पाठ करण्यात आला. संमेलनात ६ ठराव मंजूर करण्यात आले.
