सांगली जिल्ह्यातील नेलकरंजी गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका वडिलांनी आपल्या मुलीला परीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून तिची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी धोंडिराम भोसले (४५) याने शनिवारी रात्री त्याची १६ वर्षांची मुलगी साधना भोसले हिला मारहाण करून ठार मारले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलाला अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.
साधना असे मृत मुलीचे नाव आहे. तिला १२ वीच्या नीट चाचणीमध्ये कमी गुण मिळाल्यामुळे वडील धोंडिराम संतापले आणि दोघांमध्ये वाद निर्माण झाला. साधना ही अभ्यासात खूप हुशार असल्याचे म्हटले जाते आणि परंतु नुकत्याच झालेल्या परीक्षेत तिच्या खराब कामगिरीमुळे तिचे वडील संतापले.
दोघांमध्ये वाद सुरु असताना तुम्हाला सुद्धा कमी मार्क पडले होते ना, पप्पा तुम्ही कुठे कलेक्टर झालात?, असे उलट उत्तर मुलीने वडिलांना दिले. या उलट उत्तरामुळे वडिलांचा राग अनावर झाला आणि त्यांनी आपल्या मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने बेदम मारहाण केली, ज्यामध्ये तिचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे, आरोपी वडील हे एका खाजगी शाळेत मुख्याध्यापक आहेत.
हे ही वाचा :
“भारतासाठी वर्ल्ड कप जिंकलेला ‘हिरो’… आता अमेरिका गाजवतोय!
‘ऑपरेशन राहत’ ते ‘ऑपरेशन सिंधू’: मोदी सरकारच्या १२ भारतीय बचाव मोहिमा!
दिलजीत दोसांझच्या चित्रपटात पाक अभिनेत्री, प्रदर्शनावरून ‘हा’ घेतला निर्णय!
आंध्रमध्ये पक्षाच्या समर्थकाला ताफ्याच्या गाडीखाली चिरडल्यानंतर जगन रेड्डींविरुद्ध गुन्हा दाखल
आटपाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनय बहीर म्हणाले, कमी गुण मिळाले म्हणून वडिलाने मुलीला जात्याच्या लाकडी खुंट्याने मारहाण केली. त्यामुळे ती आजारी पडली, त्यानंतर तिला सुविधा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे उपचार होत नसल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे उपचारा दरम्यान तिचा सकाळी १० वाजता मृत्यू झाला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये स्पष्टपणे दिसून आले की साधनाच्या शरीरावर अनेक गंभीर आणि खोल जखमा होत्या, ज्यामुळे तिचा मृत्यू झाला.
घटनेनंतर मृताच्या आईच्या तक्रारीवरून आरोपी वडील धोंडिराम भोसले याला अटक करण्यात आली. आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले असता २४ तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे, असे अधिकारी बहीर यांनी सांगितले.
