28.3 C
Mumbai
Sunday, August 2, 2026
घरदेश दुनियापीओके हिंसाचाराबद्दल पाकिस्तानविरोधात ब्रिटनची हस्तक्षेपाची मागणी

पीओके हिंसाचाराबद्दल पाकिस्तानविरोधात ब्रिटनची हस्तक्षेपाची मागणी

५० हून अधिक खासदारांनी सरकारला लिहिले पत्र

Google News Follow

Related

पाकिस्तानव्याप्त काश्मीर (PoK) मध्ये सुरू असलेल्या हिंसाचार, आंदोलकांवरील कथित गोळीबार आणि मानवी हक्कांच्या उल्लंघनाच्या घटनांबाबत ब्रिटनमध्येही चिंता व्यक्त करण्यात आली आहे. ब्रिटनमधील ५० हून अधिक खासदारांनी परराष्ट्रमंत्री इव्हेट कूपर यांना पत्र लिहून पाकिस्तानवर राजनैतिक दबाव आणण्याची आणि परिस्थितीत तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.

ब्रॅडफर्ड ईस्टचे खासदार इमरान हुसेन यांच्या पुढाकाराने हे पत्र पाठविण्यात आले आहे. या पत्रात पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलकांवर जिवंत गोळ्या झाडल्याचे, मोठ्या प्रमाणावर अटकसत्र सुरू असल्याचे, संवाद व्यवस्था खंडित करण्यात आल्याचे आणि परिस्थिती झपाट्याने बिघडत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच या घटनांमुळे ब्रिटनमध्ये वास्तव्यास असलेल्या काश्मिरी वंशाच्या अनेक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असल्याचेही खासदारांनी म्हटले आहे.

पत्रात ब्रिटन सरकारने पाकिस्तान सरकारशी तातडीने संवाद साधावा, हिंसाचार थांबवण्यासाठी राजनैतिक प्रयत्न करावेत आणि मानवी हक्कांचा सन्मान सुनिश्चित करण्यासाठी इस्लामाबादवर दबाव आणावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलकांवरील कारवाईची स्वतंत्र चौकशी व्हावी आणि प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये निवडणुकांतील कथित गैरव्यवहार, प्रशासनाविरोधातील असंतोष आणि जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी (JAAC) यांच्या आंदोलनामुळे परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात अनेक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा विविध वृत्तांत करण्यात आला असून, अनेकजण जखमी झाले आहेत. अधिकृत मृतांचा आकडा पाकिस्तान सरकारने अद्याप जाहीर केलेला नाही.

मानवी हक्क संघटनांनीही या घटनांबाबत चिंता व्यक्त करत संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार यंत्रणेकडून स्वतंत्र चौकशीची मागणी केली आहे. आंदोलकांवर झालेल्या कथित कारवाईमुळे आणि वाढत्या तणावामुळे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील परिस्थिती अधिकच गंभीर बनल्याचे या संघटनांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा:

मेलोनी यांनी इटली प्रवेशास स्थलांतरिताना केली बंदी

जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून दोन मजुरांची गोळ्या झाडून हत्या

मोदींना लक्ष्य करणारी रुचिका अखेर नरमली; हात जोडून मागितली माफी

दिशाभूल झालेल्यांना योग्य दिशा दाखवूया, भारतासाठी एकत्र येऊया

दरम्यान, पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी आंदोलकांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळेही हा मुद्दा अधिक चर्चेत आला आहे. त्यांच्या वक्तव्यावरून विरोधक आणि मानवी हक्क संघटनांनी तीव्र टीका केली आहे. ब्रिटिश खासदारांच्या या पत्रामुळे पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील परिस्थितीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले असून, पुढील काही दिवसांत ब्रिटन सरकार या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
325,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा