32 C
Mumbai
Thursday, May 9, 2024
घरदेश दुनियादहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाचा विळखा

दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या पाकिस्तानला दहशतवादाचा विळखा

१८० दिवस, २७१ हल्ले आणि ३८९ मृत्यू

Google News Follow

Related

पाकिस्तानमध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते जूनदरम्यान १५१ दहशतवादी हल्ले झाले होते. तर, या वर्षी गेल्या सहा महिन्यांत २७१ दहशतवादी हल्ल्यांची नोंद झाली. हल्ल्यांचे हे प्रमाण ७० टक्क्यांनी अधिक आहे. पाकिस्तानी इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडी (पीआयसीएसएस)ने ही आकडेवारी जाहीर केली आहे. या अहवालानुसार, या वर्षी सहा महिन्यांत ३८९ जण दहशतवादी हल्ल्यात मारले गेले. तर, गेल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यांत २९३ लोक ठार झाले होते.

 

हे ही वाचा:

महायुतीचे सरकार ठाकरे, पवार कुटुंबिय विरहित सरकार

मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी ‘त्या’ अपमानित कष्टकऱ्याचे पाय धुतले!

दोघात तिसरा आला,आता बळ कुणाचे वाढेल?

पक्ष आणि चिन्ह आमचेच!

 

कुठे कुठे वाढलेत दहशतवादी हल्ले?

० खैबर पख्तूनवाह प्रांतात गेल्या वर्षी सहा महिन्यांच्या तुलनेत हल्ल्यांच्या प्रमाणात १०८ टक्क्यांची वाढ झाली आहे. तर, हल्ल्यातील मृत आणि जखमींच्या प्रमाणातही ५३ टक्के वाढ झाली आहे.

० बलुचिस्तानमध्ये जानेवारी ते जून २०२३ दरम्यान येथे ७५ दहशतवादी हल्ले झाले आहेत. गेल्या वर्षीच्या सहा महिन्यांच्या तुलनेत हे प्रमाण १०३ टक्क्यांहून अधिक आहे. हल्ल्यातील मृत आणि जखमींच्या प्रमाणातही ६१ टक्के वाढ झाली आहे.

० सिंधमध्ये सुरुवातीच्या सहा महिन्यांत १३ दहशतवादी हल्ले झाले होते. ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला आणि तेवढीच माणसे जखमी झाली. यातील मृत आणि जखमींच्या प्रमाणात गेल्या वर्षीच्या तुलनेत १९ टक्क्यांनी घट झाली आहे.

० पंजाबमध्ये गेल्या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत केवळ एक दहशतवादी हल्ला झाला होता. मात्र या वर्षी याच कालावधीत आठ दहशतवादी हल्ले झाले असून त्यात सहा जण ठार झाले आहेत.

हे ही

दहशतवादी हल्ले का वाढत आहेत?

या दहशतवादी हल्ल्यांसाठी तहरिक-ए-तालिबान पाकिस्तान म्हणजे टीटीपी ही दहशतवादी संघटना आहे. टीटीपीला पाकिस्तानी तालिबान म्हणूनही ओळखले जाते. या संघटनेचा हेतू पाकिस्तानमध्ये इस्लामी राजवट आणणे हा आहे. ऑगस्ट २००८मध्ये पाकिस्तान सरकारने टीटीपी संघटनेवर बंदी आणली होती. अफगाणिस्तानवर तालिबानींनी वर्चस्व मिळवल्यानंतर पाकिस्तानमध्येही टीटीपीच्या कारवाया वाढल्या आहेत. गेल्या दोन वर्षांत खैबर पख्तूनवाह आणि बलूचिस्तानमध्ये दहशतवादी हल्ल्यांध्ये वाढ झाली. हे दोन्ही प्रांत अफगाणिस्तान सीमेपासून जवळ आहेत. या वाढत्या हल्ल्यांमागे हेदेखील एक कारण आहे. तर, पंजाब आणि सिंध प्रांत अफगाणसीमेपासून लांब असल्याने ते टीटीपीच्या दहशतवादापासून बचावले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
151,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा