पाकिस्तानात नुकतीच सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून निकालही बाहेर येऊ लागले आहेत. इम्रान खान यांच्या पीटीआयचे समर्थन असलेले स्वतंत्र उमेदवार आणि नवाज शरीफ यांच्या पीएमएल-एनमध्ये सध्या अटी-तटीची रंगत सुरू आहे. नेमका निकाल यामुळे स्पष्ट होत नसला तरी दुसरीकडे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मुख्य मास्टरमाइंड हाफिज साईद याच्या मुलाचा मात्र दारुण पराभव झाला आहे.
यंदा पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकीत दहशतवादी हाफिज सईद याच्या मुलाला उमेदवारी देण्यात आली होती. सईदच्या मरकजी मुस्लिम लीगने अनेक जागांवर उमेदवार उभे केले होते. हाफिज सईदच्या पक्षाने ज्या जागा लढवल्या त्यातील एक जागेवर त्याचा मुलगा तलहा सईद हा उमेदवार होता. माहितीनुसार, तलहा सईदचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला आहे. तलहा सईद लाहोरच्या एनए-१२२ मतदारसंघातून उमेदवार होता. पण, पाकिस्तानी जनतेने दहशतवादाला नाकारलं आहे. तलहा याला २ हजार ४२ मते मिळाली आहेत. लतीफ खोसा या नेत्याने तलहा सईदला धोबीपछाड दिला आहे. लतीफ खोसा माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा निकटवर्तीय समजला जातो. लतीफ खोसाने १ लाखापेक्षा जास्त मते मिळवून ही जागा जिंकली आहे.
हाफिज सईद हा भारताचा शत्रू आहे. मुंबईवर झालेल्या २६/११ दहशतवादी हल्ल्याचा तो मुख्य मास्टरमाइंड आहे. तर तलहा सईद हा लश्कर-ए-तैयबामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या पदावर आहे. भारत सरकारने UAPA अंतर्गत तलहा सईदला दहशतवादी घोषित केलं आहे. लश्कर ए तैयबासाठी भरती आणि पैसा मिळवण्याचे काम तलहा सईद करतो. भारताविरुद्ध अनेक कारवायांमध्ये त्याचा हात आहे.
हे ही वाचा..
अभिषेक घोसाळकरांची हत्या ही उबाठाअंतर्गत चालणाऱ्या गँगवॉरचे परिणाम!
पी व्ही नरसिंह रावांसह चरणसिंग आणि डॉ. स्वामिनाथन यांना ‘भारतरत्न’
“गोळीबाराच्या गंभीर घटनेवरून विरोधकांनी राजकारण करू नये”
उत्तराखंड: हल्द्वानीत झालेली दंगल आधीच नियोजित होती!
पाकिस्तानात सार्वत्रिक निवडणुकीत तो लाहोरमधून निवडणूक लढवत होता. पीटीआय नेता आणि माजी पंतप्रधान इम्रान खान इथून निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. इम्रान खान यांना अटक झाली आणि त्यानंतर शिक्षा सुनावण्यात आली. त्यामुळे इम्रान खान ही निवडणूक लढवू शकले नाहीत.







