29 C
Mumbai
Wednesday, March 11, 2026
घरदेश दुनियाअंतर्गत भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी

अंतर्गत भ्रष्टाचारामुळे पाकिस्तानची अर्थव्यवस्था खिळखिळी

Google News Follow

Related

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) अलीकडेच प्रसिद्ध केलेल्या अहवालात नमूद केले आहे की पाकिस्तानची ढासळलेली अर्थव्यवस्था ही मुख्यतः अंतर्गत अपयशांचे परिणाम आहे. यामध्ये बाह्य दडपशाहीचा कोणताही वाटा नाही. पाकिस्तान ऑब्झर्व्हर या इंग्रजी वृत्तपत्राच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, भ्रष्टाचार, कमजोर संस्था आणि स्थानिक पातळीवरील प्रभावशाली व्यक्तींचे स्वार्थ यांनी देशाला आर्थिक होरपळीत ढकलले आहे.

IMF च्या म्हणण्यानुसार, पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार शासनाच्या जवळपास सर्व स्तरांवर पसरलेला आहे. धोरणनिर्मिती अनेकदा अशा प्रभावशाली गटांच्या हातात असते जे सरकारी संस्था स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात. अहवालात म्हटले आहे की पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार मोजण्यासाठी योग्य प्रणालीच नाही. तेथील नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो ने गेल्या दोन वर्षांत ५,३०० अब्ज रुपयांची वसुली केली आहे.

हेही वाचा..

यूएनएआयडीएसकडून एचआयव्हीबाबत दिली चेतावणी

रेल्वेत फक्त हलाल मांस; मानवाधिकार आयोगाने पाठवली नोटीस

नवोदित मुंबई श्री शरीरसौष्ठव स्पर्धा रंगणार शनिवारी

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात दहशतवादी उमरला आश्रय देणारा सातवा आरोपी अटक

IMF चे म्हणणे आहे की हा आकडा प्रत्यक्ष भ्रष्टाचाराच्या तुलनेत अत्यंत कमी आहे. यावरून पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार किती खोलवर रुजला आहे हे दिसते. रिपोर्टनुसार, सामान्य नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात जवळपास रोजच भ्रष्टाचाराचा सामना करावा लागतो, ज्यामुळे सरकारी संस्थांवरील लोकांचा विश्वास कमी होत चालला आहे. IMF ने पाकिस्तानची परिस्थिती स्पष्ट करण्यासाठी २०१९ मधील साखर संकटाचे उदाहरण दिले. प्रभावशाली व्यावसायिक नेटवर्कने साखरेची कृत्रिम साठेबाजी केली, दर वाढवले आणि बनावट खात्यांद्वारे अब्जावधी डॉलरची देवाणघेवाण केली. सरकार मात्र पूर्णपणे निष्क्रिय राहिली.

अशा घोटाळ्यांव्यतिरिक्त, IMF च्या अहवालात गुंतागुंतीची करव्यवस्था, कमजोर आर्थिक व्यवस्थापन, अपारदर्शक सरकारी खरेदी प्रक्रिया आणि सार्वजनिक संस्थांची ढिसाळ कामगिरी यांसारख्या खोल संरचनात्मक समस्यांना अधोरेखित करण्यात आले आहे. अहवालानुसार, जर पाकिस्तानने गंभीर प्रशासकीय सुधारणा लागू केल्या, तर पुढील पाच वर्षांत त्याचा GDP वाढदर ५ ते ६.५ टक्क्यांपेक्षा अधिक होऊ शकतो. IMF च्या अहवालात हेही नमूद करण्यात आले आहे की पाकिस्तानमध्ये भ्रष्टाचार हा काही नवा विषय नाही. नागरी आणि सैन्य दोन्ही सत्तांनी सुधारण्याचे आश्वासन दिले, पण त्याचबरोबर गैरवापराचे नवे प्रकारही निर्माण केले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
297,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा