पाकिस्तान सीमापार दहशतवादाला वारंवार पाठींबा देत असून याचा आणखी एक पुरावा आता जगासमोर आला आहे. पाकिस्तानी नेते चौधरी अन्वरुल हक यांनी म्हटले आहे की, दहशतवादी गटांनी लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर हल्ला केला.
हक यांच्या विधानात लाल किल्ला म्हणजे १० नोव्हेंबर रोजी किल्ल्याच्या परिसरात झालेल्या स्फोटाचा उल्लेख आहे. ज्यामध्ये १४ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्यातील आरोपी डॉ. उमर उन नबी हा जैश-ए-मोहम्मद (जेईएम) शी संबंधित ‘व्हाइट कॉलर’ दहशतवादी मॉड्यूलचा सदस्य आहे. तर, काश्मीरचे जंगल म्हणजेच पहलगाममधील पर्यटकांवर केलेला गोळीबार या घटनेशी हे विधान संबंधित आहे.
चौधरी अन्वरुल हक यांचा एक व्हिडीओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये हक म्हणाले, “मी सांगितले होते की जर तुम्ही बलुचिस्तानमध्ये रक्तपात करत राहिलात तर आम्ही लाल किल्ल्यापासून काश्मीरच्या जंगलांपर्यंत भारतावर हल्ला करू. अल्लाहच्या कृपेने, आम्ही ते केले आहे.”
पाकिस्तानने स्वतःच्या आर्थिक संकटाला आणि अंतर्गत कलहाला लपविण्यासाठी बलुचिस्तानमधील अशांततेसाठी वारंवार भारताला दोष दिला आहे. नवी दिल्लीने इस्लामाबादचे दावे जोरदारपणे फेटाळून लावले आहेत. पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध राजनैतिक आक्रमक भूमिका घेतली, ज्यामध्ये सिंधू जल करार निलंबित करणे यासह अनेक उपाययोजना केल्या. नवी दिल्लीने म्हटले आहे की जर इस्लामाबादने सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणे थांबवले तरच ते करार पुन्हा सुरू करतील.
हे ही वाचा:
मनसेमुळे उद्धव ठाकरेंना काँग्रेसने दिला डच्चू? काय म्हणाल्या वर्षा गायकवाड?
सम्राट चौधरी, विजय सिन्हाचं राहणार बिहारचे उपमुख्यमंत्री!
आंध्र प्रदेशात ‘टेक’ शंकरसह सात नक्षलवादी ठार
काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणतात, तो दहशतवादी एक वाट चुकलेला तरूण!
सीमेपलीकडून दहशतवादाला चालना देण्यात इस्लामाबादच्या भूमिकेवर पाकिस्तानी राजकारण्याने टीका करण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकडेच, खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहेल आफ्रिदी यांनी पाकिस्तान सरकारच्या दहशतवादी धोरणाचा पर्दाफाश केला. आफ्रिदी यांनी इस्लामाबादवर दहशतवादी हल्ल्यांना खतपाणी घालण्याचा आरोप केला. त्यांनी इस्लामाबादवर त्यांच्या राजकीय अजेंडा राबवण्यासाठी दहशतवाद निर्माण करण्याचा आरोप केला.







