29 C
Mumbai
Wednesday, January 28, 2026
घरदेश दुनियारुग्णालयाच्या गेटवर ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडलाच नाही

रुग्णालयाच्या गेटवर ॲम्ब्युलन्सचा दरवाजा उघडलाच नाही

रुग्णाचा दुर्दैवी गाडीतच मृत्यू

Google News Follow

Related

मध्य प्रदेशातील सतना येथे आरोग्य व्यवस्थेतील गंभीर त्रुटी पुन्हा एकदा समोर आली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या मुख्य गेटवर 108 ॲम्ब्युलन्सचा मागील दरवाजा अचानक जाम झाल्याने वेळेत उपचार न मिळाल्यामुळे एका वृद्ध रुग्णाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, प्रशासनावर टीका होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय रामप्रसाद हे घरात शेकोटीजवळ बसले असताना अचानक बेशुद्ध पडले. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रामनगर येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सतनाच्या जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. ॲम्ब्युलन्स रुग्णालयाच्या गेटपर्यंत पोहोचली, मात्र रुग्णाला बाहेर काढताना मागील दरवाजा उघडत नसल्याने मोठा गोंधळ उडाला.
हे ही वाचा:
फिलीपीन्स समुद्रात भीषण दुर्घटना

प्रजासत्ताकदिनी एक तोळा सोने १ लाख ६२ हजारांवर

कर्तव्य पथावर पंतप्रधान मोदी सर्वसामान्यांना भेटले; राजशिष्टाचार ठेवला बाजुला

यशस्वी भारत जगाला अधिक स्थिर, समृद्ध आणि सुरक्षित करतो!

दरवाजा उघडण्यासाठी चालक, रुग्णालयातील कर्मचारी आणि नागरिकांनी प्रयत्नांची शर्थ केली. काही जणांनी दरवाजाला लाथा मारल्या, तर काहींनी साधनांच्या मदतीने तो उघडण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या धावपळीत महत्त्वाचा वेळ वाया गेला. अखेर दरवाजा उघडून रुग्णाला स्ट्रेचरवर बाहेर काढण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.

या घटनेनंतर आरोग्य विभागाने प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित ॲम्ब्युलन्स सेवा समन्वयकाला नोटीस बजावून स्पष्टीकरण मागितले आहे. काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की रुग्ण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दगावला होता, मात्र कुटुंबीय आणि प्रत्यक्षदर्शींनी ॲम्ब्युलन्सच्या बिघाडामुळेच उपचारात विलंब झाल्याचा आरोप केला आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
288,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा