पहलगाम हल्ल्यातील संशयित विमानात असल्याच्या संशयावरून कोलंबोमध्ये विमानाची झडती

भारताकडून मिळाला होता अलर्ट

पहलगाम हल्ल्यातील संशयित विमानात असल्याच्या संशयावरून कोलंबोमध्ये विमानाची झडती

तामिळनाडूच्या चेन्नईहून कोलंबोला पोहोचलेल्या श्रीलंकेच्या विमानाची कसून तपासणी करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. भारताकडून मिळालेल्या अलर्टनंतर ही चौकशी आणि तपासणीची कारवाई करण्यात आली आहे. भारतात हवा असलेला संशयित विमानात असल्याचा अलर्ट मिळाल्यानंतर या हालचाली वाढल्या होत्या. याचं अलर्टच्या आधारे चेन्नईहून येणाऱ्या विमानाची श्रीलंकेने अचानक तपासणी केली.

अहवालानुसार, श्रीलंकेच्या एअरलाइन्सचे विमान शनिवार, ३ मे रोजी बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यानंतर तातडीने सुरक्षा दलांनी या विमानाला घेराव घातला. पुढे विमान आणि त्यातील लोकांची तपासणी करण्यात आली. श्रीलंकन यंत्रणेला भारताकडून अलर्ट मिळाला होता की, विमानात संशयित व्यक्ती असू शकतात. याचं माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.

सकाळी ११:५९ वाजता बंदरनायके आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाल्यानंतर श्रीलंकेतील एअरलाइन्सच्या फ्लाइट UL१२२ ची व्यापक सुरक्षा तपासणी करण्यात आली. भारतीय अधिकाऱ्यांनी श्रीलंकेला इशारा दिला होता की, पहलगाममधील सहा संशयित विमानात होते. स्थानिक वृत्तानुसार, श्रीलंका पोलिस, श्रीलंका हवाई दल आणि विमानतळ सुरक्षा युनिट्सनी संयुक्तपणे शोध मोहीम राबवली. परंतु कोणताही संशयित सापडला नाही.

श्रीलंकेच्या एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, ४ आर- एएलएस विमानाने चालवलेले फ्लाइट यूएल १२२ सकाळी ११:५९ वाजता कोलंबोमध्ये उतरले आणि स्थानिक अधिकाऱ्यांसोबत समन्वय साधून त्याची व्यापक तपासणी करण्यात आली. चेन्नई एरिया कंट्रोल सेंटरने विमानात संशयास्पद व्यक्तीबद्दल अलर्ट जारी केला होता. तपासणीनंतर विमानाला परवानगी देण्यात आल्याची पुष्टी एअरलाइनने केली, परंतु सिंगापूरला जाणारी पुढील फ्लाइट UL 308 सुरक्षा प्रक्रियेमुळे उशिरा झाली. श्रीलंकेच्या एअरलाइन्स सर्व प्रवाशांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देते आणि सर्वोच्च सुरक्षा मानके राखण्यासाठी वचनबद्ध आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

हे ही वाचा..

छत्तीसगडमधील गरियाबंदमध्ये ८ लाखांचे बक्षीस असलेल्या नक्षलवाद्याचा खात्मा

भारताच्या मच्छिमारांवर श्रीलंकन चाच्यांचा हल्ला; १७ जण जखमी

आतंकवाद्यांविरुद्ध भारत निर्णायक कारवाई करणार

पाकिस्तानमधून येणाऱ्या सर्व पोस्टल, पार्सल सेवांवर भारताकडून बंदी

२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २५ पर्यटकांसह २६ जणांचा मृत्यू झाला होता. हा हल्ला पाकिस्तान प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केला होता, त्यापैकी एक पाकिस्तानी सैन्याचा पॅरा कमांडो होता. तथापि, पाकिस्तानने या दहशतवादी घटनेत आपला सहभाग नाकारला आहे.

Exit mobile version