पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्सच्या दोन दिवसीय दौऱ्यानंतर गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी अमेरिकेत पोहचले असून ते आता दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असणार आहेत. अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार ते बुधवारी संध्याकाळी वॉशिंग्टनला पोहोचले. या दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली. यावेळी नरेंद्र मोदी आणि तुलसी गॅबार्ड यांच्यामध्ये भारत- अमेरिका संबंधांशी संबंधित विविध विषयांवर चर्चा झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय वंशाच्या असलेल्या अमेरिकन तुलसी गॅबार्ड यांना अमेरिकेच्या सर्वोच्च गुप्तचर अधिकारी म्हणून नियुक्त झाल्याबद्दल अभिनंदन केले. बुधवारी सिनेटने पुष्टी दिल्यानंतर काही तासांतच, तुलसी गॅबार्ड यांनी ओव्हल ऑफिसमध्ये राष्ट्रीय गुप्तचर संचालक म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरील पोस्टमध्ये लिहिले आहे की, “वॉशिंग्टन डीसीमध्ये अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांची भेट घेतली आणि त्यांचे अभिनंदन केले. आम्ही भारत- अमेरिका मैत्रीच्या विविध पैलूंवर चर्चा केली, ज्याच्या त्या नेहमीच एक मजबूत समर्थक राहिल्या आहेत.”
Met USA’s Director of National Intelligence, @TulsiGabbard in Washington DC. Congratulated her on her confirmation. Discussed various aspects of the India-USA friendship, of which she’s always been a strong votary. pic.twitter.com/w2bhsh8CKF
— Narendra Modi (@narendramodi) February 13, 2025
तुलसी गॅबार्ड आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा मुकाबला, सायबर सुरक्षा आणि उदयोन्मुख धोक्यांमध्ये गुप्तचर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. यानंतर आता पंतप्रधान मोदी गुरुवारी व्हाईट हाऊसमध्ये ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. तसेच अमेरिकन मंत्रिमंडळातील सदस्य आणि उद्योग नेत्यांनाही भेटतील. यापूर्वी पॅरिसमध्ये, पंतप्रधान मोदींनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत आर्टिफिशियल इंटेलिजेंस अॅक्शन समिटचे सह-अध्यक्षपद भूषवले.
पंतप्रधान मोदी अमेरिकेला रवाना होण्यापूर्वी म्हणाले की, “जानेवारीमध्ये ट्रम्प यांनी ऐतिहासिक निवडणुकीत मिळवलेला विजय आणि पदभार स्वीकारल्यानंतर ही आमची पहिली भेट असली तरी, भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापक जागतिक धोरणात्मक भागीदारी निर्माण करण्यासाठी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात एकत्र काम केल्याच्या चांगल्या आठवणी आहेत. ही भेट त्यांच्या पहिल्या कार्यकाळातील आमच्या सहकार्याच्या यशावर भर देण्याची आणि तंत्रज्ञान, व्यापार, संरक्षण, ऊर्जा आणि पुरवठा साखळी लवचिकता या क्षेत्रांसह आमची भागीदारी आणखी उंचावण्यासाठी आणि सखोल करण्यासाठी एक अजेंडा विकसित करण्याची संधी असेल. आम्ही आमच्या दोन्ही देशांच्या लोकांच्या परस्पर फायद्यासाठी एकत्र काम करू आणि जगाचे चांगले भविष्य घडवू,” असे नरेंद्र मोदी म्हणाले.
हे ही वाचा :
… म्हणून भारतीय खेळाडूंनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हाताला बांधल्या हिरव्या पट्ट्या
पवारांच्या प्रशंसेचा अर्थ ठाकरेंच्या लक्षात आलाय…
ठाकरेंना सोडून राजन साळवी आले शिंदेंकडे!
भाजपचे ज्येष्ठ नेते सुनील देवधर ‘डी-लिट’ ने सन्मानित
दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी गॅबार्ड यांना असाधारण धाडसी आणि देशभक्ती असलेली अमेरिकन महिला म्हणून संबोधले. ते म्हणाले की, तुलसी यांना आर्मी नॅशनल गार्डमध्ये तीन वेळा तैनात करण्यात आले आहे. तुलसी यांनीही राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. तसेच पदाची शपथ घेतल्यानंतर, त्यांनी गुप्तचर समुदायावर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचे वचन दिले आहे. त्या म्हणाले की दुर्दैवाने, अमेरिकन लोकांना गुप्तचर समुदायावर फारच कमी विश्वास आहे, कारण त्यांनी अशा युनिटचे राजकारणीकरण पाहिले आहे. आता आपण आपल्या राष्ट्रीय सुरक्षेवर लक्ष केंद्रित करायला हवे होते.
