27 C
Mumbai
Tuesday, March 25, 2025
घरविशेष... म्हणून भारतीय खेळाडूंनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हाताला बांधल्या हिरव्या पट्ट्या

… म्हणून भारतीय खेळाडूंनी इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात हाताला बांधल्या हिरव्या पट्ट्या

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू

Google News Follow

Related

भारत आणि इंग्लंड यांच्यात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू असून बुधवार, १२ फेब्रुवारी रोजी या मालिकेतील अखेरचा सामना अहमदाबाद येथे खेळला जात आहे. या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने हाताला हिरव्या रंगाच्या पट्ट्या बांधल्या आहेत. एका उपक्रमाचा भाग म्हणून खेळाडू या पट्ट्या हाताला लावून सामना खेळत आहेत.

भारतीय खेळाडू रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील क्रिकेट संघाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआयच्या ‘अवयवांचे दान करा आणि जीवन वाचवा’ या उपक्रमाचा भाग म्हणून हिरव्या पट्ट्या हाताला बांधल्या आहेत. सर्व खेळाडू जीवनदान देण्याच्या उदात्त कार्याला प्रोत्साहन करत आहेत. बीसीसीआयचा हा उपक्रम माजी सचिव आणि सध्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे (आयसीसी) अध्यक्ष जय शाह यांच्या विचारांतून आला आहे. हे कार्य त्यांच्या हृदयाच्या अत्यंत जवळ असून अशा सामाजिक कार्याला चालना देण्यासाठी बीसीसीआयकडे नरेंद्र मोदी स्टेडियम असल्याबद्दल ते अत्यंत आभारी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गेल्या काही दिवसांपासून, विराट कोहलीसह आघाडीच्या भारतीय स्टार खेळाडूंनी क्रिकेट प्रेमी आणि सामान्य लोकांना पुढे येऊन त्यांचे अवयव दान करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे गरजुंचे जीवन आणि कुटुंबे बदलू शकते, असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. “खेळात प्रेरणा देण्याची, एकत्र येण्याची आणि कायमस्वरूपी प्रभाव निर्माण करण्याची शक्ती आहे. या उपक्रमाद्वारे, जीवनाची देणगी सर्वांत मोठी देणगी स्वीकारणे. आपली प्रतिज्ञा आणि एक निर्णय अनेक जीव वाचवू शकतो. चला आपण एकत्र येऊन बदल घडवूया,” असे जय शाह यांनी त्यांच्या मीडिया हँडलवर म्हटले आहे.

हे ही वाचा

‘छावा’: बॉलीवूडमधील परिवर्तनाची सुरुवात!

जीबीएसचा बळी, मुंबईत पहिल्या मृत्यूची नोंद

हैदराबादमधील हनुमान मंदिरात सापडले मांसाचे तुकडे, भाविकांमध्ये संतापाची लाट!

काँग्रेसचा माजी खासदार सज्जन कुमार दोषी

सामाजिक जबाबदारी पार पाडणे असो किंवा स्टेडियममध्ये येणाऱ्या चाहत्यांसाठी सामना पाहण्याचा अनुभव अधिक चांगला देण्याचा प्रयत्न असो जय शाह नेहमीच आघाडीवर असतात. २०२३ च्या विश्वचषकादरम्यान, नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी येणाऱ्या चाहत्यांसाठी मिनी आयसीयू युनिट्ससह अनेक वैद्यकीय युनिट्स उभारण्यात आले होते. त्यांनी २० गंभीर आजाराने त्रस्त मुलांना त्यांच्या डॉक्टरांसह विश्वचषक सामना पाहण्यासाठी आमंत्रित केले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
237,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा