तेलंगणातील हैदराबादमध्ये एका हनुमान मंदिरात मांसाचे तुकडे आढळल्यानंतर तणाव निर्माण झाला. मांसाचे तुकडे पाहून धक्का बसलेल्या भाविकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आणि तपासाच्या आधारे योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
ही घटना हैदराबादच्या तप्पाचाबुतरा भागात असलेल्या झिर्रा हनुमान मंदिरात घडली. मंदिरातील शिवलिंगाच्या मागे मांसाचे तुकडे दिसून आले. या प्रकरणी मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मंदिरातील पुजाऱ्याला मांसाचे तुकडे आढळून आल्यानंतर याबाबत मंदिर समितीला माहिती दिली. ही बातमी भाविकांना समजताच त्यांनी मंदिराबाहेर गर्दी केली आणि संताप व्यक्त केला.
पोलिस उपायुक्त (डीसीपी) चंद्र मोहन यांनी तपास सुरु केल्याची पुष्टी केली आणि म्हणाले, मंदिर परिसरातील शिवलिंगाजवळ मांस असल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर आम्हाला आढळले की मंदिराचे दरवाजे बंद आहेत. मंदिराचे दरवाजे बंद असल्याने कोणत्यातरी प्राण्याने हे मांस आतमध्ये आणले असावे असा आम्हाला संशय आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. अधिक माहिती दिली जाईल.
हे ही वाचा :
वीर सावरकर निसटले त्या मार्सिलेला मोदींनी भेट दिली त्यात गैर काय?
महाकुंभ : ‘माघ पौर्णिमेला’ १ कोटी ३० लाख भाविकांनी केले स्नान!
‘पवारांची भूमिका पटली नाही तर मविआतून बाहेर पडावं’
पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला चेंबूरमधून अटक
या घटनेवर भाजप आमदार टी राजा सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हैदराबादमध्ये या घटना सामान्य झाल्या असल्याचे त्यांनी म्हटले. ते म्हणाले, यापूर्वीही अशाच घटना घडल्या आहेत. पोलिसांचे म्हणणे आहे की, श्वानाने अथवा मांजराने हे मांस मंदिरात आणले आहे. हे त्यांचे नेहमीचे स्पष्टीकरण बनले आहे. आम्ही कठोर कारवाईची मागणी करतो, असे टी राजा सिंह यांनी म्हटले.