पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स आणि अमेरिका देशांच्या दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यादरम्यान त्यांच्या विमानावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो, अशी धमकी देणारा फोन मुंबई पोलिसांना आल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांकडून तपास सुरू होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी मंगळवारी मुंबईतील चेंबूर परिसरातून एका व्यक्तीला अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी बुधवारी दिली.
मुंबई पोलिसांनी माहिती दिली होती की, “११ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला एक फोन आला होता ज्यामध्ये पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर जात असताना दहशतवादी त्यांच्या विमानावर हल्ला करू शकतात असा इशारा देण्यात आला होता. माहितीचे गंभीर स्वरूप लक्षात घेता, पोलिसांनी इतर एजन्सींना माहिती दिली आणि तपास सुरू केला.” यानंतर धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीला चेंबूर परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. तो मानसिकदृष्ट्या आजारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
Mumbai police nabs man from Chembur area over 'threat call' to PM Modi's aircraft
Read @ANI story | https://t.co/lxQRqM4sFc#NarendraModi #Mumbai #MumbaiPolice pic.twitter.com/Z2q7MHgnkL
— ANI Digital (@ani_digital) February 12, 2025
हे ही वाचा :
एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर राऊत संतापले
शनिवारपर्यंत ओलीसांना सोडा नाहीतर गाझाला बेचिराख करू!
राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन
भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स
मंगळवारी पॅरिसमध्ये फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासमवेत एआय समिटचे सह अध्यक्षपद पंतप्रधान मोदी यांनी भूषवले. आठवडाभर चालणाऱ्या या शिखर परिषदेचा समारोप जागतिक नेते, धोरणकर्ते आणि उद्योग तज्ञांच्या उपस्थितीत झालेल्या उच्चस्तरीय सत्रात झाला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेला जाणार आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा पदभार स्वीकारल्यानंतर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच भेट असेल. यावेळी अनेक महत्त्वाच्या विषयांवर आणि भारत- अमेरिका संबंध अधिक दृढ करण्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे.