माघी गणेशोत्सवानिमित्त गणपतीची स्थापना झाल्यानंतर आता विसर्जनाची तयारी सुरु झाली आहे. मात्र, गणेशमूर्तीचे विसर्जन तलावात किंवा समुद्रात करु नये. अशामुळे पर्यावरणाची हानी तसेच मोठ्या प्रमाणात पाणी प्रदूषण होते. त्यामुळे पीओपी गणपतीचे तलावात किंवा समुद्रात विर्सजन करू नये, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता. परंतु, पीओपी गणपतीचे तलावात आणि समुद्रात विसर्जन करण्यावर गणेश मंडळ ठाम असून, यावर राज्य सरकारने कोर्टात गणेश मंडळाची भूमिका मांडावी, असे म्हटले होते. यावर अध्याप तोडगा निघालेला नाही. दरम्यान, यावरून उबाठाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. हे हिंदू विरोधी सरकार असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले होते. आदित्य ठाकरेंच्या टीकेला भाजपा नेते मंत्री आशिष शेलार यांनी उत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे हे ढोंगी असल्याचे शेलारांनी म्हटले आहे.
मंत्री आशिष शेलार ट्वीटकरत म्हटले, आज माघी गणेशोत्सवातील पिओपीच्या गणेश मुर्त्या अडचणीत आलायत, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना?. कारण यांचे पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ बंद कसा पडेल याचेच प्रयत्न केले. लालबागच्या राजाची परंपरा तुम्ही खंडित केलीत. गणेशोत्सव असो वा दहिहंडी उत्सव ज्या ज्या वेळी अडचणीत सापडला तेव्हा हे कधीच त्याची बाजू मांडायला न्यायालयात गेले नाहीत, आजही जाणार असे सांगत नाहीत.
हे ही वाचा :
पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला चेंबूरमधून अटक
एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर राऊत संतापले
शनिवारपर्यंत ओलीसांना सोडा नाहीतर गाझाला बेचिराख करू!
भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स
ते पुढे म्हणाले, हिंदू देव देवता, मंदिर आणि उत्सव.. विशेषतः अयोध्येतील राम मंदिर या सगळ्याचे हे विरोधक आहेत… टीकाकार आहेत. हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांचा यांना त्रास होतो… पंढरपूरच्या विठ्ठलाच्या पायाला ज्यांनी हात लावला नाही.
जे अज़ान स्पर्धा भरवतात आणि ज्यांना “भोंग्यांचा आवाज” हल्ली सुमधुर वाटतो आणि गणपतीची आरती हातात घेणे जे टाळतात. ते आता माघी गणेशोत्सवावर बोलतात? तुमचा काय अधिकार आहे?. हे सुखकर्ता.. दुखहर्त्या… तुझे हे ढोंगी, स्वार्थी भक्त आज जी तुझी “आरती” करीत आहेत… ते म्हणजे निव्वळ ढोंग.. ढोंग आणि ढोंग. महाराष्ट्रातील गणेशभक्त यांच्या पासून सावध झालाच आहे, आता गणपती बाप्पा तूही यांचे हे ढोंगी रुप पाहून घे रे महाराजा, असे शेलार यांनी म्हटले.
श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी आहात !
◆ आज माघी गणेशोत्सवातील पिओपीच्या गणेश मुर्त्या अडचणीत आलायत, त्यावर खूश होऊन तर आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही बोलत नाही ना?
◆ कारण यांचे पिताश्रींनी मुख्यमंत्री असताना शंभर वर्षांहून अधिक मोठी परंपरा असलेला सार्वजनिक गणेशोत्सव…
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) February 12, 2025