महाकुंभातील प्रमुख स्नानांपैकी आज (१२ फेब्रुवारी) माघी पौर्णिमेचे स्नान आहे. माघी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविक प्रयागराजमध्ये दाखल आहे. संगमपासून १५ किमी अंतरावर सर्वत्र भाविकांची गर्दी आहे. याच दरम्यान, सकाळी १० वाजेपर्यंत १ कोटी ३० लाख भाविकांनी संगमात स्नान केले आहे. तर हा आकडा आज २ कोटी ५ लाखांवर जाईल असा सरकारला अंदाज आहे.
यावेळी हेलिकॉप्टरमधून भाविकांवर तब्बल २५ क्विंटल फुलांचा वर्षाव करण्यात आला. प्रयागराजकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्यानंतर वाहतूक नियोजनात बदल करण्यात आले आहे. शहरांमध्ये वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. महाकुंभ मेळ्याच्या परिसरात कोणतेही वाहन चालणार नाही, अशा कडक सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, भाविकांना संगमपर्यंत पोहोचण्यासाठी ८ ते १० किमी चालत जावे लागत आहे.
हे ही वाचा :
‘पवारांची भूमिका पटली नाही तर मविआतून बाहेर पडावं’
श्रीमान आदित्य उद्धव ठाकरे तुम्ही तर ढोंगी…
पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला चेंबूरमधून अटक
शनिवारपर्यंत ओलीसांना सोडा नाहीतर गाझाला बेचिराख करू!
गर्दी वाढू नये यासाठी भाविकांना स्नान करण्यासाठी इतर घाटांवर पाठवले जात आहे. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पहिल्यांदाच १५ जिल्ह्यांचे डीएम, २० आयएएस आणि ८५ पीसीएस अधिकारी महाकुंभ मेळ्यात तैनात करण्यात आले आहेत. लखनऊमध्ये, मुख्यमंत्री योगी पहाटे ४ वाजल्यापासून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बांधलेल्या वॉर रूममधून महाकुंभाचे निरीक्षण करत आहेत.