इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी पॅलेस्टिनी राष्ट्र स्थापनेविषयी आपली ठाम भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. “पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही,” असे म्हणत त्यांनी यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या हालचालींवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “आपल्या भूमीच्या मध्यभागी दहशतवाद्यांचे राष्ट्र लादण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, त्याला उत्तर मी अमेरिका दौऱ्यानंतर देईन,” असे नेतान्याहू म्हणाले.
त्यांनी पुढे म्हटले की, “ऑक्टोबर ७ च्या भीषण हल्ल्यानंतरही जे नेते पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देत आहेत, त्यांच्यासाठी माझा स्पष्ट संदेश आहे – तुम्ही दहशतवादाला एक मोठं बक्षीस देत आहात. पण माझा दुसरा आणि ठाम संदेश असा आहे की – हे होणार नाही. जोर्डन नदीच्या पश्चिमेला पॅलेस्टिनी राष्ट्र स्थापन होणार नाही.”
नेतान्याहू यांनी हेही नमूद केले की, “मी अनेक वर्षांपासून, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दबावाला तोंड देत, अशा दहशतवादी राष्ट्राच्या स्थापनेला विरोध केला आहे. आम्ही निर्धाराने आणि कुशल मुत्सद्देगिरीने हे टाळलं आहे. याशिवाय, जूदिया आणि समारियामधील यहुदी वसाहतींची संख्या आम्ही दुप्पट केली असून, त्याच मार्गावर आम्ही पुढे जाऊ.”
Prime Minister Benjamin Netanyahu: "There will be no Palestinian state. The response to the latest attempt to force upon us a terror state in the heart of our land will be given after my return from the United States"
"I have a clear message to those leaders who are recognizing… pic.twitter.com/1RyGknKZRC
— ANI (@ANI) September 22, 2025
दरम्यान, पंतप्रधान नेतान्याहू सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांच्या परतीनंतर या विषयावर अधिक ठोस भूमिका घेण्याची शक्यता आहे.







