26.4 C
Mumbai
Monday, July 6, 2026
घरदेश दुनियापंतप्रधान मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना

पंतप्रधान मोदी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड दौऱ्यासाठी रवाना

भारताच्या आर्थिक-सामरिक हितसंबंधांना मिळणार नवी दिशा

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या तीन देशांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले. ६ ते ११ जुलैदरम्यान होणाऱ्या या दौऱ्यात द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करणे, व्यापार व गुंतवणूक वाढवणे, संरक्षण सहकार्याला चालना देणे आणि भारतीय युवकांसाठी नव्या संधी निर्माण करणे, यावर विशेष भर दिला जाणार आहे.

दौऱ्यापूर्वी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर संदेश देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, “या तीन देशांच्या भेटीदरम्यान विविध महत्त्वाच्या बैठका आणि कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहे. भारताच्या महत्त्वाच्या भागीदार देशांसोबत आर्थिक आणि सामरिक संबंध अधिक बळकट करण्यासोबतच भविष्यातील विकासासाठी नवे मार्ग खुले करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

इंडोनेशियासोबत रणनीतिक भागीदारी आणखी मजबूत होणार

दौऱ्याची सुरुवात इंडोनेशियापासून होत असून, ६ ते ८ जुलैदरम्यान पंतप्रधान मोदी राष्ट्राध्यक्ष प्रबोवो सुबियांतो यांच्या निमंत्रणावर तेथे विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. २०१८ मध्ये भारत आणि इंडोनेशियाने आपल्या संबंधांना ‘सर्वसमावेशक सामरिक भागीदारी’चा दर्जा दिला होता. त्यानंतरचा हा पंतप्रधान मोदी यांचा पहिला द्विपक्षीय दौरा आहे. या भेटीत दोन्ही देशांतील संरक्षण, सागरी सुरक्षा, व्यापार आणि सांस्कृतिक सहकार्य अधिक व्यापक करण्यावर चर्चा होणार आहे. याशिवाय, मोदी इंडोनेशियातील भारतीय समुदायाशी संवाद साधतील आणि राष्ट्राध्यक्ष प्रबोवो यांच्यासह योग्याकार्ता येथील ऐतिहासिक प्रांबानन मंदिराला भेट देणार आहेत.

ऑस्ट्रेलियात संरक्षण, शिक्षण आणि तंत्रज्ञानावर भर

इंडोनेशियानंतर पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथे जाणार आहेत. पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांच्यासोबत होणाऱ्या चर्चेत संरक्षण, राष्ट्रीय सुरक्षा, व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, कौशल्य विकास आणि लोकांमधील संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाणार आहे. तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), क्रीडा आणि स्पोर्ट्स सायन्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्याबाबतही चर्चा होण्याची शक्यता आहे. मेलबर्नमध्ये मोदी भारतीय वंशाच्या नागरिकांनाही संबोधित करणार आहेत.

हे ही वाचा:

धो-धो पावसाचा ‘वॉटर बोनस’! २४ तासांत मुंबईच्या पाणीसाठ्यात ३.७३% वाढ

E20 इंधनावरून भारत- भूतान आमनेसामने; भारताने फेटाळले दावे

पावसाचा महाप्रलय! मुंबई-पुणे संपर्क तुटला

‘रेड अलर्ट’चा इम्पॅक्ट! मुंबईची गती मंदावली, लोकल-डबेवालेही थांबले

न्यूझीलंडसोबत व्यापार संबंधांना चालना

दौऱ्याच्या शेवटच्या टप्प्यात पंतप्रधान मोदी न्यूझीलंडचे पंतप्रधान क्रिस्टोफर लक्सन यांच्या निमंत्रणावरून ऑकलंडला भेट देतील. मार्च २०२५ मध्ये पंतप्रधान लक्सन यांच्या भारत दौऱ्यानंतर द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेते मुक्त व्यापार करार (FTA), व्यापार, गुंतवणूक आणि व्यावसायिक सहकार्य अधिक मजबूत करण्यावर चर्चा करतील. यावेळी न्यूझीलंडमधील भारतीय समुदायाशीही पंतप्रधान मोदी संवाद साधणार असून, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या भारतीयांचे ते कौतुक करणार आहेत.

‘ऍक्ट ईस्ट’ आणि इंडो-पॅसिफिक धोरणाला मिळणार बळ

या दौऱ्यामुळे भारताच्या ‘ऍक्ट ईस्ट’ धोरणाला, महासागर (MAHASAGAR) उपक्रमाला आणि मुक्त, खुल्या व सर्वसमावेशक इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या भारताच्या भूमिकेला अधिक बळ मिळेल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. भारत आणि या तीन देशांमधील आर्थिक, सामरिक, सांस्कृतिक आणि व्यापारी संबंधांना नवसंजीवनी देण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
319,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा