27 C
Mumbai
Sunday, February 1, 2026
घरदेश दुनियापीओकेमध्ये पाक सरकार विरोधात निदर्शने

पीओकेमध्ये पाक सरकार विरोधात निदर्शने

गेल्या ७० वर्षांपासून नाकारलेल्या मूलभूत हक्कांसाठीचा लढा असल्याच्या भावना

Google News Follow

Related

पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) मोठे निदर्शन होत असून अवामी कृती समितीने (एएसी) सोमवारी संपूर्ण प्रदेशात मोठ्या प्रमाणात निदर्शने सुरू केली आहेत. बंद आणि चक्का जामच्या आवाहनामुळे या भागात तणाव वाढला आहे. निदर्शकांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी पाकिस्तान सरकारकडून मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. मध्यरात्रीपासून इंटरनेट बंद करण्यात आले आहे. अलिकडच्या काळात पीओकेमध्ये पाकिस्तान सरकार विरुद्ध जनतेचा रोष सातत्याने वाढत आहे. सरकारकडून होत असलेले दुर्लक्ष याला कारणीभूत असून येथील लोक आता पाकिस्तानचे अत्याचार सहन करण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

मुजफ्फराबादमधील जमावाला संबोधित करताना, एएसीचे प्रमुख नेते शौकत नवाज मीर म्हणाले, आमची मोहीम ही कोणत्याही संस्थेविरुद्ध नसून गेल्या ७० वर्षांपासून आपल्या लोकांना नाकारलेल्या मूलभूत हक्कांसाठी आहे. ते पुढे म्हणाले की, आता पुरे झाले. एकतर आम्हाला आमचे हक्क द्या किंवा जनतेच्या रोषाला सामोरे जा, असा इशारा त्यांनी दिला आहे.

दरम्यान, पाकिस्तान सरकार या निदर्शनांना तोंड देण्यासाठी पूर्ण ताकदीचा वापर करण्याची तयारी करत आहे. पाकव्याप्त काश्मीरच्या प्रमुख शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात सशस्त्र पाकिस्तानी सुरक्षा दलांनी मार्च काढले आहेत. पंजाबमधून हजारो सैन्य तैनात करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवारी पोलिसांनी प्रमुख शहरांमध्ये जाण्या- येण्याचे मार्ग सील केले आहेत. सुरक्षा दलांना बळकटी देण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथून अतिरिक्त १,००० सैन्य पाठवण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

५० हून अधिक हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्याला लखनौमधून ठोकल्या बेड्या

सूर्यकुमार यादवकडून स्पर्धेचे मानधन पहलगाम पीडितांच्या कुटुंबियांना आणि सैन्याला

आशिया कप ट्रॉफी, भारतीय खेळाडूंची पदके हरलेल्या पाकने चोरली!

आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण

अलिकडच्या काही महिन्यांत, अवामी कृती समितीने पाकव्याप्त काश्मीरमध्ये बरीच लोकप्रियता मिळवली आहे. हजारो लोकांना त्यांच्या बॅनरखाली एकत्र केले आहे. या गटाने सुधारणांची मागणी करणारा ३८ कलमी सनद जारी केला आहे. पीओकेमधील लोक वाढत्या महागाईने त्रस्त आहेत. जीवनावश्यक सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. स्थानिक लोक त्यांच्या सुविधांची तुलना भारतीय काश्मीरमधील सुविधांशी करत आहेत आणि त्यांच्या वाईट परिस्थितीसाठी पाकिस्तानला दोष देत आहेत.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
289,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा