पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोनवर चर्चा झाली आहे. पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून ट्रम्प यांच्यासोबत अलास्कामध्ये झालेल्या बैठकीची माहिती दिली. दोन्ही नेत्यांमधील ही चर्चा अलास्का शिखर परिषदेच्या तीन दिवसांनंतर झाली, जी रशिया-युक्रेन युद्धबंदी कराराशिवाय संपली. या कॉलनंतर, पंतप्रधान मोदींनी पुन्हा एकदा सांगितले की भारताने युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी सातत्याने समर्थन केले आहे आणि त्या ध्येयासाठीच्या सर्व प्रयत्नांना पाठिंबा देतो.
पंतप्रधान मोदींनी स्वतः त्यांच्या एक्स हँडलवर याबद्दल माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी एक्सवर लिहिले, “माझे मित्र, राष्ट्राध्यक्ष पुतिन, त्यांच्या फोन कॉलबद्दल आणि अलास्का येथे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या अलिकडच्या भेटीबद्दल माहिती शेअर केल्याबद्दल धन्यवाद. भारताने युक्रेन संघर्षाच्या शांततापूर्ण तोडग्याचे सातत्याने आवाहन केले आहे आणि या संदर्भात सर्व प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. येणाऱ्या काळात आमच्या सततच्या देवाणघेवाणीची मी अपेक्षा करतो.”
दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची १५ ऑगस्ट रोजी अलास्कामध्ये रशिया-युक्रेन युद्धबंदीवर चर्चा करण्यासाठी भेट झाली होती. या भेटीकडे देशासह भारताचे लक्ष लागून होते. मात्र, या भेटीमधून युद्धबंदी बाबत कोणताही निष्कर्ष निघाला नाही.
हे ही वाचा :
हा तर चौकीदार चोर है चा पार्ट-२
“पाकिस्तानसारखं राहुल गांधींचंही प्रत्येक राजकीय लाँच अपयशी ठरतं”
ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्या स्पेस स्टेशनच्या प्रवासावर चर्चा न होऊ शकणे दुर्दैवी
ऑपरेशन सिंदूरदरम्यान पाकिस्तानने लढाऊ नौका लपवल्या, उपग्रह छायाचित्रांनी केले स्पष्ट
बैठकीपूर्वी पुतीन यांच्या स्वागतावेळी अमेरिकेने मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केले. पुतीन यांच्यासह इतर देशांना आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न अमेरिकेकडून केला गेला. विशेष म्हणजे, बैठकीनंतर पुतीन रशियाला परतत असताना त्यांच्या चेहऱ्यावर एक हास्य होते, जे ट्रम्प यांच्या धोरणाला बळी न पडल्याचे स्पष्ट दिसत होते.







