रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहेत, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी गुरुवारी (७ ऑगस्ट) सांगितले. डोभाल सध्या मॉस्को दौऱ्यावर आहेत. पुतिन यांच्या दौऱ्याच्या तारखा अद्याप निश्चित झालेल्या नसल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, रशियन वृत्तसंस्था इंटरफॅक्सच्या वृत्तानुसार, ही भेट या वर्षाच्या अखेरीस होऊ शकते. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के कर लादल्यानंतर पुतिन यांचा हा दौरा होत आहे.
रशियन मीडिया इंटरफॅक्सने आधी वृत्त दिले होते की पुतिन यांचा दौरा ऑगस्टच्या अखेरीस होऊ शकतो, परंतु नंतर असे म्हटले होते की पुतिन वर्षाच्या अखेरीस भारताला भेट देतील. या भेटीची घोषणा अशा वेळी झाली आहे जेव्हा रशियासोबतच्या व्यापारी संबंधांवरून भारत आणि अमेरिकेतील तणाव वाढला आहे. युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर (२०२२ पासून) पुतिन यांचा हा पहिलाच भारत दौरा असणार आहे.
गेल्या वर्षी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पुतिन दोनदा भेटले होते. २२ व्या भारत-रशिया शिखर परिषदेसाठी मॉस्कोमध्ये दोनही नेत्यांची भेट झाली होती. या भेटीदरम्यान, भारत-रशिया संबंध मजबूत करण्यात त्यांच्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींना रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ‘ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल’ने सन्मानित करण्यात आले होते. तर ऑक्टोबरमध्ये कझानमध्ये पंतप्रधान मोदी ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित होते तेव्हा दोन्ही नेत्यांची पुन्हा भेट झाली होती.
हे ही वाचा :
कर्नाटक मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राहुल गांधींकडून मागवले शपथपत्र
तुम्ही आमच्या सार्वभौमत्वावर टॅरिफ लावू शकत नाही!
उत्तराखंड: ३५ वर्षानंतर पुन्हा एकत्र आलेला पुण्यातील २४ मित्रांचा गट बेपत्ता!
कॅन्सरसारख्या रोगांपासून संरक्षण देणारी सुंठ !
दरम्यान, रशियाकडून तेल खरेदी केल्याने संताप व्यक्त करत भारतावर अतिरिक्त कर लादण्याची ट्रम्प यांनी घोषणा केली असताना दुसरीकडे पुतीन भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे सर्वांचे लक्ष या दौऱ्याकडे आहे.
🚨BREAKING:
Russian President Putin to visit India by the end of August, confirms NSA Ajit Doval!Major boost for India-Russia ties.
🇮🇳🔥🇷🇺 pic.twitter.com/7DmEy7bGHM— Siddharth (@Siddharth_00001) August 7, 2025







