27 C
Mumbai
Sunday, March 15, 2026
घरदेश दुनियाभारतावर लादलेल्या अतिरिक्त शुल्कावरून रशियाने अमेरिकेला सुनावले! काय म्हणाले पुतीन?

भारतावर लादलेल्या अतिरिक्त शुल्कावरून रशियाने अमेरिकेला सुनावले! काय म्हणाले पुतीन?

भारतावर रशियासोबतचा ऊर्जा व्यापार कमी करण्यासाठी दबाव आणल्याबद्दल केली टीका

Google News Follow

Related

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनावर त्यांच्या व्यापरी भागीदार भारतावर रशियासोबतचा ऊर्जा व्यापार कमी करण्यासाठी दबाव आणल्याबद्दल टीका केली. शिवाय यामुळे वॉशिंग्टनवर उलट परिणाम होईल असा इशाराही दिला. दक्षिण रशियातील सोची येथील सुरक्षा आणि भू-राजकीय तज्ञांच्या आंतरराष्ट्रीय चर्चा मंचावर बोलताना पुतिन म्हणाले की, जर रशियाच्या व्यापारी भागीदारांवर जास्त शुल्क लादले गेले तर ते जागतिक ऊर्जेच्या किमती वाढवतील आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हला व्याजदर उच्च ठेवण्यास भाग पाडेल. त्यामुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावेल, असा इशारा त्यांनी दिला.

नवी दिल्लीकडून मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाच्या आयातीमुळे भारतासोबतच्या व्यापारातील असमतोल कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश पुतीन यांनी दिले आहेत. ते म्हणाले की, भारतासोबत आम्हाला कधीही कोणतीही समस्या किंवा आंतरराज्यीय तणाव निर्माण झाला नाही. पुतीन पुढे म्हणाले की, नवी दिल्लीला बाहेरील दबावापुढे झुकण्याचे कोणतेही कारण नाही. भारत कधीही स्वतःला अपमानित होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी कधीही असे पाऊल उचलणार नाहीत. जर भारताने रशियन ऊर्जा खरेदी करणे बंद केले तर ९ अब्ज ते १० अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागेल असे ते म्हणाले. पुतीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचे मित्र म्हणून संबोधले आणि त्यांच्यासोबतच्या विश्वासार्ह संवादात त्यांना उत्तम वाटते असे म्हटले.

अमेरिकेच्या दंडात्मक शुल्कामुळे भारताला होणारे नुकसान रशियाकडून होणाऱ्या कच्च्या तेलाच्या आयातीद्वारे संतुलित केले जाईल आणि त्याचबरोबर एक सार्वभौम राष्ट्र म्हणून भारताची प्रतिष्ठा वाढेल, असा विश्वास पुतीन यांनी व्यक्त केला. ते म्हणाले की व्यापारातील असंतुलन दूर करण्यासाठी, रशिया भारताकडून अधिक कृषी उत्पादने आणि औषधे खरेदी करू शकतो.

हे ही वाचा:

भूज लष्करी तळावर संरक्षण मंत्र्यांचे ‘शस्त्रपूजन’

गाझामध्ये जे थांबतील त्यांना दहशतवादी मानले जाईल!

पंतप्रधानांकडून १०० रुपयांच्या नाण्याचे अनावरण; पहिल्यांदाच चलनावर भारत मातेचे चित्र!

गोधऱ्यात ३५ बेकायदेशीर बांधकामांवर बुलडोझर

रशियाच्या ऊर्जा आयातीसाठी अमेरिका भारतासारख्या देशांवर दबाव आणत असताना, वॉशिंग्टन इतर संसाधनांसाठी मॉस्कोवर अवलंबून राहिल्याने, पुतीन यांनी वॉशिंग्टनच्या ढोंगीपणाकडेही लक्ष वेधले. अमेरिका हा अणुऊर्जा प्रकल्प वापरणाऱ्या सर्वात मोठ्या देशांपैकी एक आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात इंधनाची आवश्यकता असते. आम्ही सर्वात मोठा पुरवठादार नाही, परंतु रशिया हा अमेरिकन बाजारपेठेत युरेनियमचा दुसरा सर्वात मोठा पुरवठादार आहे, अशी आठवण त्यांनी अमेरिकेला करून दिली.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
298,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा