34 C
Mumbai
Tuesday, November 24, 2026
घरदेश दुनियारशिया-युक्रेन युद्धात ४.९० लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू

रशिया-युक्रेन युद्धात ४.९० लाखांहून अधिक रशियन सैनिकांचा मृत्यू

सरकारी डेटा हॅकने मोठा खुलासा

Google News Follow

रशिया आणि युक्रेन यांच्यात फेब्रुवारी २०२२ पासून सुरू असलेल्या युद्धात रशियन सैन्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. रशियाच्या सरकारी सांख्यिकी संस्थेचा (रोसस्टॅट) डेटा हॅक झाल्यानंतर मिळालेल्या कागदपत्रांच्या विश्लेषणातून सप्टेंबर २०२६ अखेरपर्यंत सुमारे ४ लाख ९० हजार रशियन सैनिकांच्या मृत्यूची नोंद झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, प्रत्यक्ष मृतांची संख्या यापेक्षाही अधिक असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक सैनिकांच्या मृत्यूची सरकारी नोंद उशिराने होत असल्यामुळे युद्धातील एकूण जीवितहानीचे आकडे वाढू शकतात.

जर्मनीतील ‘डेर स्पीगल’ या नियतकालिकासह रशियातील अनेक स्वतंत्र माध्यम संस्थांनी हॅक झालेल्या डेटाचे विश्लेषण केले आहे. ‘सायबर पार्टिझन्स’ आणि ‘सायलेंट क्रो’ या हॅकर समूहांनी रोसस्टॅटच्या संगणकीय यंत्रणेत प्रवेश करून मोठ्या प्रमाणात सरकारी कागदपत्रे मिळवल्याचे सांगितले जाते. या कागदपत्रांमध्ये मृत्यूची कारणे, मृत्यूचे ठिकाण आणि संबंधित व्यक्तींच्या व्यवसायासह विविध माहितीचा समावेश आहे. या माहितीच्या आधारे युद्धात मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची संख्या निश्चित करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

हे ही वाचा:
कच्च्या तेलाच्या दरात ९० दिवसांतील नीचांकी घसरण

पुस्तकातील सावरकरांवरील उल्लेखांवरून सोनियांना कायदेशीर नोटीस

पहलगाम हल्ल्यापूर्वी काश्मीरवर चिनी उपग्रहांची नजर?

मेरठमधून दहशतवादी कनेक्शन असलेल्या उजैदला अटक

या आकडेवारीची विश्वासार्हता तपासण्यासाठी ‘मीडियाझोना’ आणि ‘मेडुझा’ या स्वतंत्र माध्यम संस्थांनी चार वेगवेगळ्या स्रोतांमधील नोंदींची पडताळणी केली. त्यामध्ये मृत्युमुखी पडलेल्या सैनिकांची नावांसह यादी, वारसाहक्कासंबंधी सरकारी नोंदी, यापूर्वी लीक झालेली कागदपत्रे आणि रोसस्टॅटची अधिकृत आकडेवारी यांचा समावेश होता. या पडताळणीत सैनिकांच्या नावांसह उपलब्ध असलेल्या मृत्यूच्या नोंदींपैकी ९५.१ टक्के नोंदी हॅक झालेल्या डेटाबेसमध्येही आढळल्या. त्यामुळे या आकडेवारीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

दरम्यान, रोसस्टॅटने नोव्हेंबरच्या सुरुवातीला आपल्या यंत्रणेवर सायबर हल्ला झाल्याचे मान्य केले असले, तरी संवेदनशील डेटा चोरीला गेल्याचे नाकारले आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीजने जुलै २०२६ मध्ये रशियाच्या ४ ते ४.५० लाख सैनिकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला होता. ‘मीडियाझोना’ आणि ‘मेडुझा’ यांच्या पुढील विश्लेषणानुसार, मृत्यूच्या नोंदींना होणारा विलंब आणि बेपत्ता सैनिकांचा विचार करता सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रत्यक्ष मृतांची संख्या ७ लाख २० हजार किंवा त्याहून अधिक असण्याची शक्यता आहे. मात्र, हा अंदाज असून अधिकृतरीत्या पुष्टी झालेला आकडा नाही. या खुलाशामुळे रशिया-युक्रेन युद्धातील मानवी हानी आणि युद्धाच्या दीर्घकालीन परिणामांबाबत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा सुरू झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा