23 C
Mumbai
Thursday, December 25, 2025
घरदेश दुनियामास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरकडून १ कोटी

Google News Follow

Related

मिशन ऑक्सिजनला दिला मदतीचा हात

भारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने ‘मिशन ऑक्सिजन’ या मोहिमेअंतर्गत १ कोटींची मदत जाहीर केली आहे. या मदतीमुळे आता ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करून ते रुग्णालयात वितरित करण्यात येणार आहेत. सचिन तेंडुलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेत सहभाग घेतला आहे.

कोरोनाच्या पार्शवभूमीवर आज केंद्रीय मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक

इस्रायलमध्ये धार्मिक उत्सवात मोठी दुर्घटना

‘या’ शोएबने घेतली अरविंद केजरीवालांची विकेट

पुणे कोविड वाॅर रूमची विशेष व्हाॅट्सॲप सुविधा

त्याने यासंदर्भात म्हटले आहे की, करोनाच्या या संकटकाळात देशातील आरोग्यव्यवस्था चोविस तास काम करत आहे. त्या व्यवस्थेवरही मोठा ताण आला आहे. अशा परिस्थितीत लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा करणे खूप महत्त्वाचे आहे. अनेक लोक मदतीचा हात पुढे करत आहेत. जवळपास २५० पेक्षा अधिक लोकांनी एकत्र येत मिशन ऑक्सिजन ही मोहीम सुरू केली आहे. त्या माध्यमातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आयात करून ते भारतातील रुग्णालयात वितरित करण्यात येणार आहेत. मी या मोहिमेत भाग घेतला आहे. मी खेळत असताना लोक माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच मी यश मिळवू शकलो. आता लोकांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज आहे. करोनाविरोधातील या युद्धात आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे.
सचिन तेंडुलकरने याआधी प्लाझ्मा दान करण्यासाठी पुढाकार घेतला होता. २४ एप्रिलला आपल्या ४८व्या वाढदिवशी त्याने व्हीडिओ प्रसारित करून लोकांनी प्लाझ्माचे दान करावे असे आवाहनही त्याने केले.

दिल्ली कॅपिटल्सकडून १.५ कोटी

दरम्यान, आयपीएलमधील एक संघ दिल्ली कॅपिटल्सनेही १.५ कोटींची मदत जाहीर केली आहे. या मदतीच्या माध्यमातून लोकांना आवश्यकत ती वैद्यकीय मदत मिळू शकेल. त्यात ऑक्सिजनचे सिलिंडर्स पुरवता येतील. त्याआधी, राजस्थान रॉयल्स या संघाने ७.५ कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती.
करोनाच्या या काळातही आयपीएल खेळविली जात असल्याबद्दल टीका होत असताना खेळाडू, फ्रँचाइझींकडून मदत करण्यात यावी अशी मागणी होऊ लागली होती. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने त्यादिशेने पहिले पाऊल टाकले. त्याने पीएम केअर्स फंडाला ५० हजार डॉलर इतकी रक्कम दिल्यानंतर त्याचे कौतुक झाले. त्यानंतर ब्रेट ली यानेही ४० लाखांची मदत क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून केली होती.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
285,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा