सिक्कीममधील एका निर्माणाधीन असलेल्या बोगद्यात मिथेन वायूचा भीषण स्फोट होऊन दरड कोसळली. या घटनेत बोगद्याचे प्रवेशद्वारच बंद झाले. त्यामुळे कामगारांना बाहेरच पडता आले नाही. या दरड दुर्घटनेत ९ कामगारांचा मृत्यू झाला असून, किमान १६ जण अद्याप आत अडकले असल्याची माहिती आहे. NHPC अर्थात ‘नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन’च्या कर्मचाऱ्यांसह एकूण २५ कामगार बोगद्यात अडकले होते.
उर्वरित १६ कामगारांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. सिक्कीममधील नामची जिल्ह्यातील ‘NHPC तीस्ता स्टेज-VI जलविद्युत प्रकल्पा’च्या बांधकाम सुरु असलेल्या बोगद्यात खडतर परिस्थितीत बचाव पथकांची मोठी मोहीम सुरू आहे. मिथेन वायू, ऑक्सिजनची कमी पातळी, अत्यंत कमी दृश्यमानता आणि बोगद्याचा अरुंद मार्ग यामुळे बचाव कार्यात गंभीर अडथळे येत असून, अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचणे बचाव पथकांसाठी कठीण होत आहे.
हे ही वाचा:
जंतर-मंतरवर राजकारण, नीट देणारे खरे विद्यार्थी मात्र अभ्यासात!
विराट कोहलीच्या एका सल्ल्याने बदलले पी. व्ही. सिंधूचे आयुष्य
आधी दहशतवाद थांबवा, मगच सिंधू करार!
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीखालील खडकातून नैसर्गिकरीत्या बाहेर पडणारा मिथेन वायू बोगद्याच्या आत सुमारे १.५ किलोमीटर अंतरावर साचला. हा वायू बाहेर काढण्याच्या प्रयत्नात स्फोट झाला आणि त्यामुळे दरड कोसळून बोगद्याचा एक भाग बंद झाला. घटनेनंतर काही कामगार ताबडतोब बाहेर पळण्यात यशस्वी झाले, मात्र अनेक जण बोगद्यात खोलवर अडकून पडले. सोमवारी दुपारी ३:४० च्या सुमारास जिल्हा प्रशासनाला या घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर एनडीआरएफ, एसडीआरएफ, जिल्हा पोलीस आणि अग्निशमन दलाची पथके तातडीने घटनास्थळी पोहोचली.







