२२ एप्रिल रोजी, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने या प्रसिद्ध पर्यटनस्थळाची शांतता हिरावून घेतली, ज्यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला आणि असंख्य कुटुंबे उद्ध्वस्त झाली. त्या दिवशी त्या परिसरात उपस्थित असलेल्यांपैकी एक होती वैशाली भट्ट, भारतीय वंशाची सिंगापूरची नागरिक, जी बईसरान व्हॅलीमधून हल्ला सुरू होण्यापूर्वीच बाहेर पडली होती.
मृत्यूच्या कराल दाढेतून बालंबाल बचावल्यामुळे हादरलेल्या वैशाली भट्ट म्हणाल्या की, भारताने घेतलेल्या लष्कराने केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईमुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः या ऑपरेशनला नामांकित केले होते, ते ऐकल्यानंतर ती खूप भावूक झाली. तिच्यासाठी, आणि अनेकांसाठी, ‘सिंदूर’ हे नाव केवळ प्रतीकात्मक नव्हते तर ते खूप मनाला भिडणारे होते.
“मी २२ एप्रिलला पहलगाममध्ये होते आणि त्या हल्ल्यातून बचावले यावर आजही विश्वास बसत नाही. किती नशिबवान होते, हे सांगूच शकत नाही,” असे वैशाली यांनी सिंगापूर दौऱ्यावर आलेल्या भाजप खासदार डॉ. हेमांग जोशी यांना सांगितले. जोशी हे संजय झा यांच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा भाग होते.
पहलगामच्या त्या घटनेनंतर दररोज मी उठल्यावर बातम्या पाहत होते, भारताने काही प्रत्युत्तर दिले आहे का, हे पाहण्यासाठी. पण ७ मे रोजी जेव्हा मी ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्याचे वाचले, तेव्हा ते नाव माझ्या हृदयाला भिडले. मी खूप रडले. आमच्यासाठी याचा खूप मोठा अर्थ आहे,” असे त्या म्हणाल्या.
“सिंदूर हे नाव त्या हल्ल्यात बळी पडलेल्या सर्वांचे, त्यांच्या कुटुंबांचे आणि आमचा बदला घेण्यासाठी करण्यात आलेल्या कारवाईसाठी अगदी योग्य होते, असे वाटले. जे तुम्ही केलंत, ते कोणीच करू शकले नसते, असे त्या म्हणाल्या.
हे ही वाचा:
इराणमध्ये ३ भारतीय नागरिक बेपत्ता!
नोटांची बंडले सापडलेल्या न्या. वर्मांविरुद्ध महाभियोगाची शिफारस
मणिपूरमध्ये सरकार स्थापनेसाठी हालचाली!
काँग्रेस नेता आणि ऑलिम्पियन बजरंग पूनिया म्हणतो, गुंडगिरीपुढे कायदा हरला!
७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर अचूक हल्ले चढवले. या कारवाईत नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले आणि १०० हून अधिक दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले.
‘सिंदूर’ हे नाव – जे विवाहित हिंदू स्त्रिया कपाळावर लावतात – हे नाव विशेषतः भावनिकदृष्ट्या स्पर्श करणारे ठरले. या नावाने त्या महिलांच्या वेदनांना आणि जिद्दीला आवाज दिला, ज्यांनी आपल्या पतींना या हल्ल्यात गमावले.
या धार्मिक प्रेरित हल्ल्यात दहशतवाद्यांनी मुद्दामहून हिंदू पुरुषांना लक्ष्य करत त्यांचा बळी घेतला होता.
उत्तर प्रदेशातील शुबम द्विवेदी हल्ल्यात बळी पडलेल्यांपैकी एक होते. नुकतेच त्यांचे लग्न झाले होते. त्यांच्या पत्नी शन्या म्हणाल्या की, ऑपरेशनचं नाव ‘सिंदूर’ ठेवणं त्यांच्या हृदयाला भिडणारं होतं. ऑपरेशनचं नाव ‘सिंदूर’ ठेवलं, हे आमच्यासारख्या विधवांशी थेट नातं जोडणारं होतं. हे खूप वैयक्तिक आहे,” असे त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वतः ऑपरेशन सिंदूर हे कोडनेम ठरवले होते.
