ऑलिंपिक पदक विजेता आणि ज्येष्ठ कुस्तीपटू तसेच काँग्रेस नेता बजरंग पूनिया याने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांना पॉक्सो कायद्याच्या प्रकरणातून क्लीन चिट दिल्यानंतर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. बजरंग पूनिया उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथे एका खासगी कार्यक्रमासाठी आला होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्याने बृजभूषण यांना क्लीन चिट मिळाल्याच्या मुद्द्यावर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले.
“जर पोक्सो (POCSO) कायदा लावला गेला होता, तर आतापर्यंत अटक का झाली नाही?, असा सवाल उपस्थित करत बृजभूषण म्हणाला की, “सरकारने आधीच बृजभूषण यांना पाठिंबा दिला होता. एका अल्पवयीन मुलीने स्पष्टपणे आपले जबाब दिले होते, मग न्यायालय कोणत्या जबाबाला मान्यता देते?”
त्याने पुढे सांगितले की, त्या अल्पवयीन मुलीवर आणि इतर सहा मुलींवर दबाव टाकण्यात आला. त्यामुळेच त्यांनी मागे पाऊल घेतले. सरकार बृजभूषण यांना पाठिंबा देत आहे. मुलींना घाबरवून-धमकावून जबाब मागे घेण्यास भाग पाडले जात आहे.
हे ही वाचा:
“सोडा आणि फळांच्या रसाने वाढतो मधुमेहाचा धोका, सावध रहा!”
“आली रे आली… आता इंग्लंडची वेळ आली!”
पंतच्या शतकी खेळीवर जहीर खान खूश
पनामातील मंदिरात खासदार सर्फराज पोहोचले आणि…
गुंडगिरीपुढे कायदा पराभूत
बजरंग म्हणाला, आजच्या काळात काय घडत आहे ते योग्य वाटत नाही. सरकारला फक्त आपले मतच प्रिय आहे. जो मुलींविरोधात वागतो, त्याला वाचवणे सरकारसाठी महत्त्वाचे झाले आहे. एकदा मुलीने जबाब दिला की, तो मागे घेतला जात नाही. पण तरीही तिला मागे हटवण्यात आले. गुंडागर्दीपुढे आजचा कायदा कमी पडतोय.
तो पुढे म्हणाला, देशभर जशा पद्धतीने साजरे केले जात आहे ते पाहून वाईट वाटते. या मुलींना अजूनही दोष दिला जात आहे. आज नाही तर उद्या ही परिस्थिती तुमच्यावरही येऊ शकते. जागरूक व्हा आणि चुकीच्या गोष्टींचा विरोध करा.”
पार्श्वभूमी: कोर्टाचा निर्णय
दिल्लीच्या एका न्यायालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्यावर एका अल्पवयीन कुस्तीपटूने लावलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपासंदर्भातील प्रकरण बंद करण्यास दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या क्लोजर रिपोर्टला मान्यता दिली आहे. यामुळे त्यांना पॉक्सो कायद्यातून क्लीन चिट मिळाली आहे.
