मणिपूरचे भाजप आमदार ठोकचोम राधेश्याम सिंग यांनी बुधवारी (२८) राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेतल्यानंतर ४४ आमदार नवीन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचा दावा केला. राधेश्याम सिंह यांनी इतर नऊ आमदारांसह राजभवन येथे राज्यपालांची भेट घेतली. ते म्हणाले, “जनतेच्या इच्छेनुसार ४४ आमदार सरकार स्थापन करण्यास तयार आहेत. आम्ही हे राज्यपालांना सांगितले आहे. या समस्येवर काय उपाय असू शकतो यावरही आम्ही चर्चा केली.”
ठोकचोम राधेश्याम सिंग म्हणाले, राज्यपालांनी आमचे विचार लक्षात घेतले आहेत आणि लोकांच्या हितासाठी कारवाई सुरू करतील.” सरकार स्थापनेचा दावा करणार का? असे विचारले असता, भाजपचे केंद्रीय नेतृत्व निर्णय घेईल असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, विधानसभा अध्यक्ष सत्यव्रत यांनी वैयक्तिक आणि संयुक्तपणे ४४ आमदारांची भेट घेतली आहे. नवीन सरकार स्थापनेला कोणीही विरोध केलेला नाही. लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या टर्ममध्ये कोविडमुळे दोन वर्षे वाया गेली आणि या टर्ममध्ये संघर्षामुळे आणखी दोन वर्षे वाया गेली आहेत.
हे ही वाचा :
काँग्रेस नेता आणि ऑलिम्पियन बजरंग पूनिया म्हणतो, गुंडगिरीपुढे कायदा हरला!
तब्बल दोन वर्षांनी प्रेयसीला लक्षात आले! प्रियकर निघाला मुस्लिम
‘मला गोळ्या घाला, इथेच गाडून टाका’
“हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गाचे अमृत फळ!”
६० सदस्यीय विधानसभेत सध्या ५९ आमदार
दरम्यान, भाजप नेते एन. बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर फेब्रुवारीपासून मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मणिपूरच्या ६० सदस्यीय विधानसभेत सध्या ५९ आमदार आहेत. एका आमदाराच्या निधनामुळे एक जागा रिक्त आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीकडे एकूण ४४ आमदार आहेत, ज्यात ३२ मेईतेई, तीन मणिपुरी मुस्लिम आणि नऊ नागा आमदार आहेत. काँग्रेसचे पाच आमदार आहेत जे सर्व मेइतेई आहेत. उर्वरित १० आमदार कुकी आहेत, त्यापैकी सात जण भाजपच्या तिकिटावर गेल्या निवडणुकीत जिंकले होते, दोन कुकी पीपल्स अलायन्सचे आहेत आणि एक अपक्ष आमदार आहे.
