मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एका घटस्फोटित हिंदू महिलेनं तिच्या मुस्लिम प्रियकरावर जबरदस्तीने इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून कमला नगर पोलीस ठाण्यात आरोपी नदिमविरुद्ध प्रकरण नोंद करण्यात आलं आहे. मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रेयसीला तब्बल दोन वर्षांनी हे कळले की आपला प्रियकर हा धर्माने मुस्लिम आहे.
AajTak च्या वृत्तानुसार, आरोपी नदिमने पीडितेस सांगितले की तो तिच्याशी तेव्हाच लग्न करेल, जेव्हा ती धर्मांतरण करून मुस्लिम होईल आणि तिच्या पहिल्या विवाहातून जन्मलेल्या मुलाची सुंता केली पाहिजे. पाच वर्षांपासून हे सुरू होते मात्र दोन वर्षांपूर्वी तिला लक्षात आले की तिचा प्रियकर मुस्लिम आहे.
प्रेमसंबंधाची सुरुवात आणि फसवणूक
२५ मे रोजी ३५ वर्षीय घटस्फोटित महिला कमला नगर पोलिस ठाण्यात पोहोचली. तिने सांगितले की, १२ वर्षांपूर्वी घटस्फोट झाल्यानंतर ती तिच्या मुलासोबत राहत होती. तीन वर्षांपूर्वी तिची ओळख शेजारी राहणाऱ्या नदिमशी झाली, जो अनेक दिवसांपासून तिच्याशी बोलायचा प्रयत्न करत होता. त्यावेळी त्याने आपले नाव अमित असल्याचे सांगितले.
जून २०२२ मध्ये, नदिमने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेसोबत शारीरिक संबंध ठेवले, असा आरोप तिने केला. मात्र, लग्नाबाबत विचारल्यावर नदिम सतत टाळाटाळ करत असे. नंतर नदिमने सांगितले की, तो मुस्लिम आहे आणि लग्नासाठी तिला व तिच्या मुलाला इस्लाम स्वीकारावा लागेल, आणि मुलाची सुंता करावे लागेल.
हे ही वाचा:
“हाय ब्लड प्रेशरवर नियंत्रण ठेवण्यासाठी निसर्गाचे अमृत फळ!”
“सोडा आणि फळांच्या रसाने वाढतो मधुमेहाचा धोका, सावध रहा!”
“आली रे आली… आता इंग्लंडची वेळ आली!”
जितेश शर्माच्या रापचिक खेळीने लखनऊचा धुव्वा!
बलात्कार, धमकी आणि ब्लॅकमेलिंग
१३ मे रोजी, पीडितेच्या मुलाच्या अनुपस्थितीत नदिम तिच्या घरी आला. त्याने जबरदस्तीने कपडे काढले, बलात्कार केला आणि त्याचे फोटो व व्हिडीओ काढले, असा आरोप आहे. यानंतरही इस्लाम स्वीकारा नाहीतर फोटो-व्हिडीओ व्हायरल करीन, अशी धमकी त्याने दिली.
पीडितेने हेही सांगितले की, तिला नंतर समजले की नदिम आधीच विवाहित आहे. नदिमने मात्र सांगितले की त्याच्या कुटुंबीयांनी त्याचं लग्न जबरदस्तीने लावून दिलं आणि तो सध्या पत्नीसोबत राहत नाही.
हिंदू रीतींवर बंदी, बुरखा घालण्यास भाग पाडणे
पीडितेच्या म्हणण्यानुसार, नदिम तिला बुरखा घालायला सांगत असेल तसेच टीळा लावू नको, गुरुवारी उपवास करू नको, यासाठी सक्ती करत असे. तसेच तिला कुठेही जाण्याआधी त्याला सांगून जाण्यास भाग पाडत असे. परवानगीशिवाय बाहेर गेल्यास मारहाण आणि शिवीगाळ करत असे.
पोलीस कारवाई आणि कायदेशीर गुन्हे
पीडितेच्या तक्रारीवरून पोलीसांनी नदिमविरुद्ध खालील कायद्यांनुसार गुन्हे दाखल केले आहेत:
-
भारतीय दंड संहिता (BNS) कलम 69 आणि 352(2)
-
मध्य प्रदेश धार्मिक स्वातंत्र्य कायदा अंतर्गत कलम 3 आणि 5
