अमेरिकेने भारतावर ५० टक्के टॅरीफ लागू केल्यावर जागतिक स्तरावर विविध प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अनेकांना भारतावर हा अन्याय असल्याचे किंवा भारताशी असलेले अनेक वर्षांचे संबंध अमेरिकेने या निर्णयाने ताणले गेल्याचे मत व्यक्त केले.
हा टॅरीफ २७ ऑगस्टला लागू केल्यावर भारताने आपल्या भूमिकेवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा टॅरीफ जाहीर झाल्यावर भारताने त्याविरोधात कणखर भूमिका घेतली आहे. रशियाकडून तेल विकत घेऊ नका असा इशारा अमेरिकेने देत भारतावर हा टॅरीफ लादला आहे.
आता त्यावर भारताचे मित्र असलेल्या देशांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. फिजीचे पंतप्रधान सितिवेनी लिगमामादा राबुका यांनी सांगितले की, त्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडील अमेरिकन व्यापार निर्बंधांबाबत सूचित करताना म्हटले – “कोणीतरी तुमच्यावर खूश नाही, पण तुम्ही इतके सक्षम आहात की या अडचणींना तोंड देऊ शकता.”
राबुका हे तीन दिवसांच्या भारतदौऱ्यावर असून, पंतप्रधान म्हणून त्यांच्या या पहिल्या अधिकृत भेटीचे उद्दिष्ट व्यापार, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य, क्षमतावाढ व सागरी सुरक्षेच्या क्षेत्रात भारत-फिजी सहकार्य बळकट करणे आहे.
अमेरिकेच्या शुल्कवाढीची पार्श्वभूमी
अमेरिकेने भारतावर लादलेले नवीन व्यापार शुल्क बुधवारी लागू झाले. याआधीचे २५% शुल्क दुप्पट करून आता ते ५०% करण्यात आले आहे. हे पाऊल भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरू ठेवण्यामुळे उचलण्यात आले. या शुल्कवाढीमुळे भारतीय निर्यातदार, व्यापारी व तज्ज्ञांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.
ओशन ऑफ पीस” संकल्पना
नवी दिल्लीतील ५४ वे सप्रू हाऊस व्याख्यानमालेत बोलताना राबुका म्हणाले, आत्ता जगात जे काही घडते आहे, त्याचा तुमच्या (भारताच्या) अमेरिकेसोबतच्या संबंधांवर परिणाम होतो आहे. पण मोदीजी तुम्ही या अडचणींना सामोरे जाण्यासाठी पुरेसे प्रबळ आणि सक्षम आहात.”
हे ही वाचा:
जम्मू-काश्मीर : वैष्णोदेवी मार्गावर भूस्खलनात ३३ जणांचा मृत्यू!
पर्यटकांसोबत किंग कोब्राचीही आवडती जागा कोणती ?
गणेशोत्सवात आंदोलन; जरांगेंचा हेतू तरी काय ?
थाळी वाजवणारे हात, ढोल वाजवणार का?
राबुकांनी पुढे स्पष्ट केले की त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी अद्याप थेट चर्चा केलेली नाही, मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान व चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी संवाद साधला आहे.
त्यांनी सांगितले की, “या प्रयत्नात भारत एक महत्त्वाचा भागीदार आहे. फिजी आणि भारत मिळून ‘ओशन ऑफ पीस’ ही संकल्पना वास्तवात आणू शकतात, जी फक्त पॅसिफिकसाठी नाही तर जागतिक शांतता व स्थिरतेसाठी योगदान ठरेल.”
मोदी-राबुका बैठक
या आठवड्यात पंतप्रधान मोदी व राबुका यांच्यात व्यापक चर्चा झाली. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार, दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक व जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय केला.
मोदींनी राबुका यांच्या “ओशन ऑफ पीस” या दृष्टिकोनाचे कौतुक केले व ते पॅसिफिक प्रदेशासाठी शाश्वत, सुरक्षित व स्थिर भविष्य घडवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे सांगितले.







