31 C
Mumbai
Saturday, December 13, 2025
घरदेश दुनियासुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा रद्द

सुनीता विल्यम्सचा अंतराळ प्रवास दुसऱ्यांदा रद्द

अंतराळयानात बिघाड; पुन्हा उड्डाण करणार

Google News Follow

Related

अंतराळ यानात आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे भारतीय वंशाची अमेरिकेची अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांचा अंतराळप्रवास दुसऱ्यांदा रद्द झाला. अंतराळयानात झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे सुनीता विल्यम्स यांचा तिसरा अंतराळप्रवास सलग दुसऱ्यांदा लांबणीवर पडला. स्टारलाइन अंतराळयानाचे दुरुस्तीचे काम इंजिनीअर करत आहेत. सर्व काही ठीक झाले तर रविवारी दुपारी १२ वाजून तीन मिनिटांनी पुन्हा सुनीता उड्डाण करतील. याबाबत नासाने ट्वीट करून माहिती दिली.

सुनीता विल्यम्स आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर उड्डाण करण्यासाठी पूर्णपणे सज्ज होत्या. मात्र ‘नासा’ने दिलेल्या माहितीनुसार, अंतराळयानात तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त केल्यानंतर रविवारी फ्लोरिडातील केनेडी स्पेस सेंटर येथून ‘स्टारलायनर’ अंतराळयान झेप घेईल. याआधी ७ मे रोजी नासा आणि विमान निर्माता कंपनी बोइंग यांच्या संयुक्त मोहिमेत तांत्रिक बिघाड झाल्याने सुनीता यांचा अंतराळप्रवास रद्द झाला होता.

सुनीता विलियम्स आणि अंतराळवीर बॅरी बुच विल्मोर हे नासाच्या व्यावसायिक क्रू मोहिमेअंतर्गत स्टारलायनर अंतराळयानात सवार होणारे पहिले अंतराळवीर असतील. हे यान रॉकेट कंपनी युनायटेड लाँज अलायन्स (यूएसए)चे ऍटलास-५ रॉकेटवर अंतराळात पाठवले जाईल.

हे ही वाचा:

“एनडीएमध्ये येण्यासाठी उद्धव ठाकरेंकडून नरेंद्र मोदींना संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू”

निवडणूक झाली, एक्झिट पोल्सही जाहीर आता नरेंद्र मोदी लागले कामाला

बंगालची भाजपला साथ; ममतांना धक्का

केंद्रातील सत्तेवर महाराष्ट्राचा परिणाम नाही!

सुनीता यांचा विक्रम

सुनीता विल्यम्स अंतराळात विक्रमी ३२२ दिवस राहिल्या आहेत. पहिल्यांदा ९ डिसेंबर, २००६ रोजी त्या अंतराळात गेल्या होत्या. त्या २२ जून २००७पर्यंत तिथे राहिल्या. त्यानंतर १४ जुलै, २०१२ रोजी त्या पुन्हा अंतराळप्रवासासाठी गेल्या. तिथे त्या १८ नोव्हेंबर, २०१२पर्यंत राहिल्या.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
284,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा