28 C
Mumbai
Friday, September 17, 2021
घरदेश दुनियातालिबानचा 'या' प्रांतात पराभव

तालिबानचा ‘या’ प्रांतात पराभव

Related

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने कब्जा करून एक आठवडाही झालेला नाही. परंतु एका आठवड्यात तालिबानविरुद्धचा लढाही सुरु झाला आहे. अफगाणिस्तानच्या बागलान प्रांतातील ३ जिल्हे अफगाणिस्तानने पुन्हा एकदा गवळे आहेत. बानो, पूल ए हेसार, दिह सलाह हे तीन जिल्हे अफगाणिस्तानने गमावले आहेत. यावेळी झालेल्या लढाईत अफगाणिस्तानच्या ६० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. अफगाणिस्तानमध्ये  तालिबानविरुद्ध कारवाईला अत्यंत वेगाने सुरवात झाली आहे.

काबुलवर तालिबानने कब्जा केल्यानंतर संपूर्ण अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा कब्जा झाल्याचे चित्र आहे. परंतु वस्तुस्थिती वेगळी आहे. उत्तर अफगाणिस्तानमध्ये तालिबानविरोधी एक फळी तयार होत आहे. या फळीचे नाव ‘नॉर्दर्न अलायन्स’ असे आहे. अहमद मसूद या अफगाण नेत्याने या फ्लॉचे नेतृत्व स्विकारले आहे. अहमद शाह मसूद या अफगाण राजकारण्याचा हा मुलगा आहे. २००१ सालापासून पहिल्यांदा ‘नॉर्दर्न अलायन्स’चा झेंडा फडकावला गेला आहे. अफगाणिस्तानच्या डोंगराळ भागातील पंचशीर भागात ‘नॉर्दर्न अलायन्स’ची स्थापना झाली आहे.

हे ही वाचा:

पुलवामामध्ये ३ अतिरेक्यांना कंठस्नान

दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंविषयी बोलू नये

बैल गेला नि झोपा केला

भारताने बनवली जगातील पहिली डीएनए लस

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर तालिबानने घरोघरी जाऊन लोकांची हत्या करायला सुरवात केली आहे. शोधून शोधून पत्रकारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना मारण्यासाठी तालिबानचा दहशतवादी काबूलमध्ये फिरत आहेत. कालच डीडब्ल्यू न्यूज नावाच्या एका जर्मन वृत्तवाहिनीच्या एक पत्रकाराला गंभीर इजा पोचवली तर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील एका व्यक्तीची हत्याही केली. त्याव्यतिरिक्त अजून एका नातेवाईकाला गंभीर दुखापती झाली. या घटनेनंतर या पत्रकाराने जर्मनीला पलायन केले. त्याचबरोबर त्या पत्रकाराच्या कुटुंबातील व्यक्तींनीही जर्मनीत यशस्वीपणे पलायन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,408अनुयायीअनुकरण करा
3,030सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा