बांग्लादेश सध्या कट्टरपंथी विचारसरणीच्या आगीत होरपळत आहे. अराजकता आणि हिंसाचाराच्या वातावरणात बांग्लादेश नॅशनल पार्टीचे (बीएनपी) कार्यकारी अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचे पुत्र तारिक रहमान यांची देशात पुनरागमन होत आहे. या पार्श्वभूमीवर बांग्लादेशातील अमेरिकन दूतावासाने नागरिकांसाठी अलर्ट जारी केला आहे. बांग्लादेशात कार्यरत असलेल्या अमेरिकन दूतावासाने जारी केलेल्या सूचनेत म्हटले आहे, “माध्यमांच्या वृत्तानुसार, बांग्लादेश नॅशनल पार्टी (बीएनपी) ने २५ डिसेंबर रोजी सकाळी ११:४५ वाजता ढाका येथे एक्सप्रेसवे (३०० फूट रोड) तसेच हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळ ते गुलशन या मार्गावर मोठ्या सभेचे आयोजन केले आहे. ही सभा कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांच्या आगमनानिमित्त होणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.”
अमेरिकन दूतावासाने पुढे नमूद केले आहे, “या काळात ढाका किंवा आसपास प्रवास करणाऱ्या नागरिकांनी अधिक वेळ गृहीत धरून पर्यायी मार्गांचा विचार करावा. हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांनी आपली विमानतिकीट आणि प्रवासाची कागदपत्रे सोबत ठेवावीत व पोलिस तपासणी नाक्यांवर ती दाखविण्यास तयार राहावे. दूतावासाचे कामकाज सध्या नियमितपणे सुरू आहे.” अमेरिकन दूतावासाने असेही सांगितले आहे की, नागरिकांनी आपल्या नियोजित प्रवासाचा आढावा घ्यावा आणि जादा वेळ राखून ठेवावा. जर तुम्ही ढाक्यातील हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवास करण्याची योजना आखत असाल, तर विमानतिकीट सोबत ठेवा आणि पोलिस तपासणी नाक्यांवर दाखविण्यास सज्ज राहा. मोठ्या सभा, आंदोलन किंवा निदर्शनांच्या आसपास असाल, तर विशेष खबरदारी घ्यावी. अद्ययावत माहितीसाठी स्थानिक माध्यमांवर लक्ष ठेवावे.
हेही वाचा..
राष्ट्रपतींकडून ‘जी राम जी विधेयक’ला मंजुरी
आता भाजपा शहरात आणि ग्रामीण भागातही नंबर वन
परदेशी मिशनच्या सुरक्षेसाठी आम्ही कटिबद्ध
संघ हिंदूंच्या संरक्षणाच्या बाजूने
बांग्लादेशात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून मोठ्या प्रमाणात हिंसाचार पाहायला मिळत आहे. ढाका-८ मतदारसंघातील अपक्ष उमेदवार शरीफ उस्मान हादी यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या झाल्यानंतर संपूर्ण देश संतप्त झाला आहे. विविध ठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत.







