29.4 C
Mumbai
Saturday, November 7, 2026
घरदेश दुनियाठाकरे, नवाझुद्दीनच्या भेटीचे 'राज' ?

ठाकरे, नवाझुद्दीनच्या भेटीचे ‘राज’ ?

मराठीतून ट्विट करत केली घोषणा

Google News Follow

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ या चित्रपटात बाळासाहेब ठाकरे यांची भूमिका साकारणारा अभिनेता ‘नवाझुद्दीन सिद्दीकी’ आज ‘राज ठाकरे’ यांच्या भेटीला आल्यामुळे चर्चा होत आहे. गेले काही दिवस नवाझुद्दीन सिद्दीकी आपल्या वैयक्तिक कारणांमुळे चर्चेत आला आहे. त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे सध्या तो चर्चेत आहे. पण आज ‘नवाझुद्दीन सिद्दीकी’  एका विशेष कारणामुळे चर्चेत आला आहे.

काय आहे संदेश ?
आपल्या ट्विटर हँडलवर मराठीमधून नवाझुद्दीनने ट्विट करत हि माहिती दिली आहे. प्रथम त्याने मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा देऊन”मराठी नाटक , मराठी सिनेमा, आणि महाराष्ट्राची लोककला यांचा मी चाहता आहेच. सर्वांना मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा. जय महाराष्ट्र लवकरच अभिजित पानसे यांच्याबरोबर काहीतरी  इंटरेस्टिंग येणार आहे” अशी माहिती त्याने या ट्विटर संदेशात दिली आहे. रानबाजार या गाजलेल्या वेबसिरीजचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्याबरोबर काम करताना दिसेल अभंजित पानसे यांनाही नवाझुद्दीनचे ट्विट रिट्विट केलेले दिसत आहे. अभियुजीत पानसे यांच्यासोबत तो चित्रपट करणार कि वेब सिरीज याबाबत लवकरच माहिती समोर येईल.

आज राज ठाकरे यांच्याबरोबरच दिग्दर्शक अभिजित पानसे यांचीही भेट नवाझुद्दीन सिद्दीकी याने घेतली आहे. नवाझने या भेटीचे समाजमाध्यमांद्वारे घोषणा केली आहे. दरम्यान मराठीतील या नवीन कामासाठीच राज ठाकरे यांची भेट असल्याची चर्चा होत आहे. २०१९ साली अभिजित पानसे लिखित आणि दिग्दर्शित आलेल्या ‘ठाकरे’ या चित्रपटानंतर नुकत्याच आलेल्या ‘रानबाजार’ हि सीरिज बरीच गाजली होती. त्यामुळे नवाझुद्दीन आणि अभिजित पानसे आता प्रेक्षकांना काय देणार याकडे सगळ्यांची उत्सुकता लागून राहिली आहे.

 

कौटुंबिक वादामुळे चर्चेत
नवाझुद्दीन सिद्दीकी ची पहिली पत्नी आलीया हिने त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. याविषयी तिने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केला होता. त्यात तिने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यात तिने असे म्हंटले आहे कि, नवाझुद्दीन तिच्यापासून त्यांच्या मुलांना हिसकावण्याचा प्रयन्त करत आहे. शिवाय तिला आर्थिक अडचणीही जाणवत आहेत.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा